आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दात घासण्यासाठी अंड्याच्या टरफलाचे पावडर, वाचा काही रंजक Fact's

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगात आपल्या आजुबाजुला अनेक घटना घडामोडी घडत असतात. विविध माध्यमांतून आपण त्याबाबत माहिती घेत असतो. पण प्रत्येक गोष्टीबद्दल सर्वकाही आपल्याला माहिती असेलच असे नाही. अनेक बाबी आपल्या वाचनात येत नाहीत, किंवा आपल्याला त्या माहीत होत नाहीत. विशेषतः इतिहासातील अनेक गोष्टींबाबत आपल्याला त्यामानाने कमीच माहिती असते. अनेक अशा गोष्टी आहेत, ज्या आपल्या रोजच्या वापरातही असतात पण त्याबाबत आपल्याला माहिती नसतात. अशाच काही रंजक बाबी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

टूथब्रशचा शोध कोणी लावला?
आज आपल्या दातांची निगा घेण्याच्या दृष्टीने बाजारात हजारो प्रकारचे टूथब्रश उपलब्ध आहेत. पण दात घासण्याची सुरुवाच हजारो वर्षांपूर्वी झालेली आहे. अगदी सुरुवातीला काही प्राण्यांच्या अंड्याच्या टरफलापासून बनवलेल्या पावडरने दात घासले जात होते. इसवीसन पूर्व 5000 मधील हा काळ होता. त्यानंतर रोमन काळात झाडांच्या काड्या आणि ग्रीकमध्ये जाड कपड्यांच्या वापर दात घासण्यासाठी व्हायचा. सुमारे 800 वर्षांपूर्वी चिनींनी पहिल्यांदा टूथब्रश तयार केला. त्यांनी विशिष्ट प्राण्यांचे केस बांबू किंवा धातूच्या काडीला जोडून हा ब्रश तयार केला. 18 व्या शतकात विल्यम रायट नावाच्या एका ब्रिटीश व्यक्तिने तुरुंगात असताना एका हाडाचे हँडल तयार केले. त्याला छिद्र पाडून त्यात डुकराचे केस लावले आणि त्यापासून ब्रश तयार केला. त्यानंतर त्याने मोठ्या प्रमाणात याचे उत्पादन घेऊन त्याची विक्री केली. पुढे केसांच्या ऐवजी नायलॉनच्या धाग्यांचा वापर ब्रशमध्ये होऊ लागला. त्यानंतरच्या काळात त्यात अनेक बदल होत गेले आणि सध्या आपण विविध प्रकारचे ब्रश पाहत आहोत.

पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, असेच काही रंजक Fact's