आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोमनाथ चॅटर्जा पुन्हा माकपमध्ये परतणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली | माजी लोकसभाध्यक्ष सोमनाथ चॅटर्जी तब्बल सात वर्षांनंतर पुन्हा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षात परतणार आहेत. ८६ वर्षीय चॅटर्जी तब्बल १० वेळा लोकसभेचे खासदार राहिले आहेत. भारत- अमेरिका अणु कराराच्या मुद्यावर २००८ मध्ये डाव्या पक्षांनी यूपीए-१ सरकारचा पाठिंबा काढून घेतला होता. परंतु चॅटर्जींनी लोकसभाध्यक्षपद सोडण्यास नकार दिला होता. त्यामुळे जुलै २००८ मध्ये त्यांना माकपमधून काढण्यात आले होते.
बातम्या आणखी आहेत...