आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बापाने केला होता वर्ल्ड ट्रेड सेंटरवर हल्ला, त्याचाच मुलगा अमेरिकेत बनला फायर फायटर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ओमर अहमद - Divya Marathi
ओमर अहमद
न्यूयॉर्क - वर्ल्ड ट्रेड सेंटरवर 1993 मध्ये बॉम्बस्फोट घडवून आणणाऱ्या दहशतवाद्यांपैकी एकाचा मुलगा आता अमेरिकेत अग्निशमन दलाचा अधिकारी बनला आहे. पिता अहमद अब्देल सत्तार सध्या दहशतवाद प्रकरणी तुरुंगात कैद आहे. त्याचाच मुलगा ओमर अहमद सत्तार (30) याला अमेरिकेतील फायर डिपार्टमेंटमध्ये नोकरी मिळाली आहे. त्याने फायर डिपार्टमेंटमधूनच पद्वी मिळवली आहे. 
 
>> वृत्तसंस्थेने न्यूयॉर्क पोस्टच्या दाखल्याने दिलेल्या माहितीनुसार, दहशतवादी अब्देल सत्तार आता 58 वर्षांचा आहे. त्याला संघीय प्रशासनाने हिंसाचार भडकावणे आणि ज्यू समुदायाच्या लोकांच्या हत्येप्रकरणी 2005 मध्ये दोषी ठरवले होते. 
>> 9/11 हल्ल्याच्या 6 महिन्यानंतर अहमद अब्देल सत्तारला अटक करण्यात आली. त्यावेळी तो एल्म पार्क परिसरात पोस्टल वर्कर होता. 

पित्याने मास्टरमाइंडला पुरवली होती युद्धसामुग्री
>> अब्देल सत्तारवर वर्ल्ड ट्रेड सेंटरवर हल्ल्याचा मास्टरमाइंड शेख ओमर अब्दुल रहमानला युद्धसामुग्री पुरवल्याचे आरोप हगोते. या हल्ल्यात 6 जणांचा मृत्यू झाला होता. 
>> मास्टरमाइंड रहमान एकेकाळी ज्यू धर्मगुरू होता. तो अंध असून सध्या 24 वर्षांचा तुरुंगवास भोगत आहे. 

9/11 हल्ला पीडिताच्या मुलाचीही निवड
>> द पोस्टला दिलेल्या एका प्रतिक्रियेत ओमर अहमदने आपल्या वडिलाचा उल्लेख केला नाही. पण, अमेरिकेत फायर फायटरची नोकरी मिळाली याचा आनंद त्याने व्यक्त केला. 
>> त्याने सांगितल्याप्रमाणे, हेच काम त्याला नेहमीपासून करायचे होते. लहानपणापासूनच तो फायर फायटर्सचा फॅन होता. फायर फायटर लोकांचा जीव वाचवतात ते नायक असतात असे त्याच्या मनात लहानपणापासूनच आहे. 
>> फायर डिपार्टमेंटच्या प्रवक्त्यांनी सांगितल्याप्रमाणे, त्यांना ओमरच्या पित्याबद्दलची माहिती होती. प्रत्येक उमेदवाराची माहिती काढल्यानंतरच त्यांना परीक्षेला बसवले जाते. विशेष म्हणजे, यात 278 जण पद्वीधर झाले. त्यामध्ये 9/11 हल्ला पीडिताच्या मुलाचा देखील समावेश आहे.
बातम्या आणखी आहेत...