आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

डेमीला २ स्पर्धांना जायचे होते; केली ‘मिस युनिव्हर्स’ची निवड; डेमी लेने जिंकला किताब

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लास वेगास- ‘मिस युनिव्हर्स-२०१७’चा किताब दक्षिण अाफ्रिकेच्या २२ वर्षीय डेमी ले नेल पीटर्सने जिंकला अाहे. या स्पर्धेचे अायाेजन अमेरिकेच्या लास वेगासमध्ये करण्यात अाले हाेते. एकूण ९२ देशांच्या साैंदर्यवतींनी या स्पर्धेत सहभाग घेतला. ‘टाॅप-३’मध्ये ‘मिस साऊथ अाफ्रिका’सह ‘मिस काेलंबिया’ व ‘मिस जमैका’ पाेहाेचल्या हाेत्या. या वेळी परीक्षकांनी तिघींना निर्णायक प्रश्न विचारला की, ‘तुमचे सर्वात माेठे वैशिष्ट्य काेणते? मिस युनिव्हर्स बनल्यावर जग अधिक सुंदर करण्यासाठी तुम्ही स्वत:च्या विशेषत्वाचा कसा उपयाेग कराल?’ डेमी ले हिच्या प्रगल्भ व धाडसी उत्तरानेच तिला ‘मिस युनिव्हर्स’चा किताब मिळवून दिला. तिने उत्तर दिले- ‘एका मिस युनिव्हर्सचे वैशिष्ट्य तिचा अात्मविश्वास असताे. मी माझ्या संपूर्ण जीवनात कधीही काेणाला घाबरले नाही. मी जगातील प्रत्येक महिलेला सक्षम बनवण्याचा व भीतीवर नियंत्रण मिळवण्यात त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करेन.’ डेमी ले हिने किताब जिंकल्याने ३९ वर्षांनंतर दक्षिण अाफ्रिकेला या साैंदर्य स्पर्धेत विजय मिळाला. यापूर्वी १९७८ मध्ये मार्गारेट गार्डिनर हिने ‘मिस युनिव्हर्स’चा किताब पटकावला हाेता. 


डेमी लेने नॉर्थ वेस्ट विद्यापीठातून व्यवसाय प्रशासन शाखेत शिक्षण घेतले. तिची मिस वर्ल्ड - २०१७ व  मिस युनिव्हर्स- २०१७ या दोन्हींमध्ये दक्षिण आफ्रिकेचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवड झाली होती. दोन स्पर्धांच्या तारखा सोईस्कर नसल्यामुळे तिने मिस वर्ल्डमधून नाव मागे घेतले. डेमी ले आफ्रिकेत महिलांना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देत आहे. डेमीने स्पर्धेदरम्यान एका मुलाखतीत सांगितले होते की, काही दिवसांपूर्वी एका गुंडाने बंदुकीने मला धमकावले होते. ही घटना मनाला लागली,त्यामुळे मी स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण घेण्याचा निर्णय घेतला. जगातील प्रत्येक महिला स्वत:ची सुरक्षा करण्यात सशक्त व्हावी,अशी माझी इच्छा आहे.

 

पुढील स्‍लाइडवर वाचा, भारताची श्रद्धा टॉप-१० मध्येही येऊ शकली नाही...

बातम्या आणखी आहेत...