आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीनचा कांगावा: एनएसजी प्रवेशाने संतुलन बिघडेल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीजिंग- भारताच्या अणुपुरवठादार गटातील प्रवेशाने दक्षिण आशियातील व्यूहात्मक संतुलनाला हादरा बसेल. यामुळे भारत वैध अणुशक्तिशाली देश ठरेल आणि त्याचा पाकिस्तानला धोका होईल, असे चीनच्या अधिकृत प्रसारमाध्यमांमध्ये म्हटले आहे. भारताच्या एनएसजी प्रवेशास चीनचा विरोध आहे.

सरकारी ग्लोबल टाइम्स वृत्तपत्रामध्ये प्रकाशित दुसऱ्या लेखात चीनने एनएसजीच्या ४८ सदस्य देशांत भारताच्या समावेशास विरोध दर्शवला असून पाकिस्तानबाबत चिंता व्यक्त केली आहे. भारताच्या प्रवेशाने दक्षिण आशियातील व्यूहात्मक संतुलनाला धक्का बसेल तसेच आशिया प्रशांत प्रदेशाच्या शांतता आणि स्थैर्याला ठेच बसेल, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे. एनएसमधील सहभागातून भारत आण्विक सामर्थ्यामध्ये पाकिस्तानपेक्षा पुढे ठेवू इच्छित आहे. भारत आणि पाकिस्तानातील अणू संतुलनाला तडा बसेल, असे फू शियांगगियांग यांनी लिहिले आहे.

अरुणाचल सीमेवरील अहवालास चीनकडून महत्त्व नाही : पीएलएतुकडीने अरुणाचल प्रदेश सीमेवर आपल्या मर्यादेचे उल्लंघन केल्यावरून भारत अाणि चिनी जवानांमध्ये उडालेल्या संघर्षाच्या वृत्ताला चीनने कमी महत्त्व दिले आहे. सीमा सीमावर्ती क्षेत्रात शांततेसाठी बांधील अाहे, असेे प्रवक्ते कांग यांनी सांगितले.

ओबामा - लामा बैठकीमुळे अमेरिकेचा शब्द मोडीत
अमेरिकी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि दलाई लामा यांच्या बैठकीमुळे तिबेटच्या स्वातंत्र्याला समर्थन देण्याचे अमेरिकेचे आश्वासन मोडीत निघाल्याचे सांगत यामुळे द्विपक्षीय सहकार्याला धक्का बसेल, असा इशारा चीनने दिला आहे. दोन्ही नेत्यांच्या व्हाइट हाऊसमधील बैठकीचा संदर्भ देत चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लू कांग म्हणाले, तिबेटचा विषय हा चीनचा अंतर्गत विषय आहे. त्यात हस्तक्षेप करण्याचा कोणत्याही देशाला हक्क नाही.

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)