आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

द. कोरियात स्वातंत्र्यसैनिकाच्या अपमानामुळे नागरिकांत संतापाची लाट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दक्षिण कोरियात स्वातंत्र्यसैनिकांचा खूप आदर केला जातो. स्वातंत्र्यसंग्रामात सहभागी झालेल्यांचा अपमान कोणताही नागरिक सहन करत नाही. देशातील इंचियोन या शहरातील पोलिसांनी दहशतवादविरोधी इशारा देणाऱ्या पत्रकावर प्रसिद्ध स्वातंत्र्यसैनिक आन जुंग गियोन यांच्या हाताने लिहिलेल्या ओळी लावल्या आहेत. त्यांना १९०९ मध्ये जपानी शासकांनी फाशी दिली होती. 

इंचियोन शहर पोलिसांच्या या कामावर नागरिक नाराज आहेत. देशभरातील माध्यमांमध्ये पोलिसांच्या या कामाचा निषेध करण्यात आला. पोलिसांनी आपल्या देशातील धाडशी नायकांच्या अस्मितेचा विचार करायला हवा होता, अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर आल्या.  

गेल्या वर्षी जपान सरकारच्या एका प्रवक्त्याने जुंग गियोन यांना ‘दहशतवादी’ असे संबोधले होते. यामुळेदेखील हे प्रकरण गंभीर आहे. दक्षिण कोरियातील नागरिक मात्र त्यांना नायक मानतात. इंचियोन पोलिसदेखील जुंग गियोन यांना दहशतवादी मानतात का? पोलिसांच्या प्रमुख अधिकाऱ्यांनी जाहीरपणे याबद्दल स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. 
}koreatimes.co.kr
 
बातम्या आणखी आहेत...