आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दक्षिण कोरियाचा दावा: उत्तर कोरियाने घेतली हिरोशिमापेक्षाही शक्तिशाली अणुबॉम्बची चाचणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उत्तर कोरियाने पाचवी अणुचाचणी घेतली आहे. याबाबतचा दावा दक्षिण कोरियाने केला आहे. ही चाचणी आतापर्यंतची सर्वात शक्तिशाली असल्याचे सांगितले जात आहे. - Divya Marathi
उत्तर कोरियाने पाचवी अणुचाचणी घेतली आहे. याबाबतचा दावा दक्षिण कोरियाने केला आहे. ही चाचणी आतापर्यंतची सर्वात शक्तिशाली असल्याचे सांगितले जात आहे.
सेऊल - उत्तर कोरियाने पाचवी अणुचाचणी घेतली. याबाबतचा दावा दक्षिण कोरियाने केला आहे. ही चाचणी आतापर्यंतची सर्वात शक्तिशाली असल्याचे सांगितले जात आहे. दक्षिण कोरियन लष्‍कराच्या माहितीनुसार, उत्तर कोरियाची अणुचाचणी स्थळ पुंगे-रीमध्‍ये 5.3 रिश्‍टर स्केल तीव्रतेचे कृत्रिम भूकंपाचे धक्के बसले आहेत. तज्ज्ञ म्हणतात, उत्तर कोरियाच्या या बॉम्बची क्षमता 1945 मध्‍ये अमेरिकेने हिरोशिमावर टाकलेल्या अणुबॉम्बपेक्षा जास्त आहे. जानेवारी महिन्यात उत्तर कोरियाने हायड्रोजन बॉम्बची चाचणी घेतली. 9 सप्टेंबर रोजी असतो उत्तर कोरियाचा स्थापना दिवस...
- 9 सप्टेंबर रोजी उत्तर कोरिया आपला स्थापना दिवस साजरा करत असतो. 1948 मध्‍ये याच दिवशी उत्तर कोरिय हा स्वातंत्र देश म्हणून अस्तित्वात आला होता.
- यानिमित्त उत्तर कोरिया अणुचाचणी करुन स्थापना दिन साजरा करु शकतो असेही म्हटले जात होते.
- जपान व दक्षिण कोरियाच्या अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार , 5.3 तीव्रतेचा भूकंप आल्याचे सांगितले आहे.
- दक्षिण कोरियाची वृत्तसंस्था योनहापला एका हवामान अधिका-याने सांगितले, की उत्तर कोरियात कृत्रिम भूकंपाचे झटके बसले. यातून शक्यता बळवते, की या देशाने अणुचाचणी घेतलीयं.
जपान म्हणाला, विरोध करु
- जपानचे मंत्रिमंडळ सचिव योशीहिदे सुगा यांनी तातडीने पत्रकार परिषद बोलवली.
- सुगा म्हणाले, भूकंप आल्यामुळे उत्तर कोरियाने अणुचाचणी घेतली असण्‍याची शक्यता आहे.
- वृत्त प्रसारक एनएचकेनुसार, जपानचे संरक्षण मंत्रालय एक विमान पाठवण्‍याचा विचार करत आहे, यामुहे तेथील किरणोत्साराचा पत्ता लागू शकेल.
- दुसरीकडे जपानचे परराष्‍ट्र मंत्री फुमियो किशिदा म्हणाले, जर उत्तर कोरियाने अणुचाचणी घेतल्याचे वृत्त खरे असेल तर आम्ही याचा तीव्र विरोध करु. संयुक्त राष्‍ट्राच्या (यूएन) सुरक्षा परिषदेतही हा मुद्दा मांडणार आहे.
- 2006 साली पहिल्या अणुचाचणी नंतर उत्तर कोरियावर यूएनने कडक निर्बंध लादले होते.
तज्ज्ञ काय म्हणतात?
- कोरिया इंस्टीट्यूट फॉर डिफेन्स अॅनालिसिसचे किम जिन-मूनुसार, सेऊलचे अधिकारी अनेक महिन्यांपासून सांगत होते, की उत्तर कोरिया चाचणीसाठी तयारी करत आहे.
- जॉन्स हॉ‍पकिन्स विद्यापीठात अमेरिका-कोरिया इन्स्टीट्यूट म्हणाले, आम्ही मागील महिन्यापासून वेबसाइट 38 नॉर्थ पाहत आहोत. यासाठी सलग हालचाली सुरु होत्या.
का आण्विक शस्त्रे उत्तर कोरिया बनवतो?
- उत्तर कोरियाने 1985 मध्‍ये अणुप्रसार बंदी करारावर (एनपीटी) सही केली होती. करारानुसार तो अणुशस्त्र विकसित करु शकला नसता. मात्र हे मान्य करायला कोरिया तयार नव्हता.
- 2003 मध्‍ये उत्तर कोरियाने या करारातून बाहेर पडण्‍याची घोषणा केली.
- या देशाला अमेरिका व त्याच्या मित्र राष्‍ट्रांना आपली शक्ती दाखवू इच्छत आहे. यामुळे तो नेहमी चाचण्‍या घेत राहतो.
पुढील स्लाइड्सवर वाचा, उत्तर कोरियाने कधी घेतल्या अणुचाचण्‍या?
बातम्या आणखी आहेत...