आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उन यांनी १५ जणांना फासावर लटकवले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सेऊल - उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांनी वर्षभरात १५ अधिकाऱ्यांना फासावर लटकवल्याचे आदेश दिल्याचे दक्षिण कोरियाच्या गुप्तचर संस्थेने बुधवारी खासदारांना सांगितले. १५ अधिकाऱ्यांनी उन यांच्या अधिकाराला आव्हान दिल्यानंतर त्यांच्याविरुद्ध ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात येते.

खासदार शीन क्योंग मिन म्हणाले, राष्ट्रीय गुप्तचर सेवेचे प्रमुख ली बयोंग हो यांनी दिलेल्या माहितीत दुसऱ्या महायुद्धात नाझी जर्मनीवर मिळवलेल्या विजयाला ७० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल किम उन पुढील महिन्यात रशियाला भेट देण्याची शक्यता आहे. ली यांनी माहिती कशी मिळवली हे सांगितले नाही. दरम्यान, मिन यांच्या दाव्यानंतर गुप्तचर संस्थेशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. उन यांच्या वडिलांच्या निधनानंतर किम जोंग उन यांनी २०११ मध्ये उत्तर कोरियाची सूत्रे स्वीकारली. यानंतरच्या काळात त्यांनी अनेक महत्त्वाच्या पदांवरील व्यक्तींना बडतर्फ केले.

उन यांनी २०१३ मध्ये देशद्रोहाच्या आरोपाखाली आपले मामा (आत्याचे पती) जांग सोंग थेक यांना फाशीची शिक्षा दिली होती. या घटनेवरून किम जोंग उन यांना सत्तेवर पकड बसवण्यात अपयश येत असल्याचे दिसते, असे सेऊल येथील नॉर्थ कोरियन सायन्स विद्यापीठातील प्रो. यांग मू-जीन यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...