आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जहाज दुर्घटना; कप्तानास जन्मठेप, ३०० जणांचा झाला होता मृत्यू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सेऊल - दक्षिण कोरियाच्या समुद्रकिनाऱ्यावर गेल्या वर्षी झालेल्या दुर्घटनाप्रकरणी कप्तान ली जून-सेयोक यांना जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. दुर्घटनेत ३०० जणांचा मृत्यू झाला होता. मृतांत २५० मुलांचा समावेश होता.

बुडत्या जहाजाला सोडून पळून जाणे म्हणजे मृत्युशय्येवरील रुग्णावर उपचार न करण्यासारखेच आहे, अशा शब्दांत न्यायालयाने फटकारले. ग्वाँगझू कोर्टात कप्तान सेयॉकला मृत्युदंडाची शिक्षा मिळावी, अशी मागणी करण्यात आली होती. ते आपल्या प्रवाशांना सोडून पळून गेले होते, असा ठपका त्यांच्यावर होता. त्यामुळेच शालेय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता आणि त्यामुळे पालकांना दु:ख झेलावे लागले होते. कप्तान जहाजातून पळून जात असतानाचा एक व्हिडिआेदेखील कोर्टात सादर करण्यात आला. त्यात प्रवासी आतमध्ये अडकून पडल्याचे दिसून आले होते. कप्तान सियोकला कनिष्ठ न्यायालयाने ३६ वर्षांची शिक्षा ठोठावली होती. परंतु मृतांच्या नातेवाइकांनी ही शिक्षा कमी असल्याचे म्हटले होते. कोर्टाने ही विनंती मान्य करून कप्तानला जन्मठेप सुनावली. परंतु त्यामुळे काहीही फरक पडणार नाही. चालक दलाच्या चौदा जणांनाही वेगवेगळी शिक्षा झाली आहे.

सेयॉक यांची क्षमायाचना
कप्तान सेयॉकने दुर्घटनेनंतर काय करावे, हेच समजत नव्हते, असे म्हटले आहे. त्यामुळे पळून गेलो. त्याबद्दल सेयॉक यांनी न्यायालयाची माफी मागितली.
फोटो - कप्तान सेयॉक
बातम्या आणखी आहेत...