आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दक्षिण कोरिया : भ्रष्टाचाराच्या कटात पार्क याही सहभागी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सेऊल - दक्षिण कोरियाच्या राष्ट्राध्यक्ष पार्क ग्यून या आपली मैत्रीण चोई सून-सिलसह भ्रष्टाचाराच्या कारस्थानात सहभागी होत्या. मात्र त्यांच्यावर खटला चालवणे शक्य नाही. कारण राष्ट्राध्यक्ष पदावर असल्याने ते नियमात बसत नाही. या पदावरून त्यांना हटवल्यास प्रकरण न्यायालयात जाऊ शकते. द.कोरियाच्या तपास पथकाने ही माहिती दिली.

पार्क ग्यून दक्षिण कोरियाच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्षा आहेत. एक महिन्यापासून त्यांच्याविरुद्ध निदर्शने सुरू आहेत. चोई सून सिल व त्यांच्या दोन सहकाऱ्यांना लाखो डॉलर्सचा भ्रष्टाचार केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. सून सिल यांनी सॅमसंग व ह्युंदाईसह ५१ कंपन्यांकडून ६.५ कोटी डॉलर्सची देणगी वसूल केली असल्याचा आरोप आहे. उद्योजक कुटुंबांना धमकावून आपल्या कंपनीसाठी १.२ कोटींचे कंत्राट संमत करवून घेतल्याचाही आरोप आहे.

सरकारी तपासकर्त्यांच्या वतीने ली योंग रेयोल यांनी टीव्हीसाठी दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, यांनी कंपन्यांवर पैशांसाठी दबाव आणला. त्यांचे पथक राष्ट्राध्यक्षा पार्क ग्यून विरुद्धही तपास करणार असल्याचे सांगण्यात आले. घटनेनुसार त्यांच्यावर खटला चालवता येणार नाही. मात्र त्यांना पदावरून हटवल्यास त्यांनाही अटक केली जाईल. राष्ट्राध्यक्ष कार्यालयातून यावर कोणताही खुलासा करण्यात आला नाही. मात्र सर्व आरोपांचा इन्कार करण्यात आला आहे.

महाभियोग कठीण
ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्ष दिल्मा रुसेफ यांच्यावर संसदेत महाभियोग चालवून त्यांना पदावरून हटवले. मात्र पार्क यांच्यावर महाभियोग चालवणे विरोधी पक्षासाठी तितके सोपे काम नाही. महाभियोग संमत होण्यासाठी संसदेतील ३०० पैकी २/३ मतांची गरज असते. ग्यून हे यांच्या पक्षाकडे १२९ जागा आहेत. फेब्रुवारी २०१८ पर्यंत त्यांचा कार्यकाल आहे.
बातम्या आणखी आहेत...