आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दक्षिण कोरियाच्या महिला राष्ट्राध्यक्षांना भ्रष्टाचार भोवला, पार्क गेन-हुई यांची हकालपट्टी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सेऊल- दक्षिण कोरियाच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्षा पार्क गेन-हुई यांची राष्ट्राध्यक्ष पदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे. भ्रष्टाचार आणि घोटाळ्याच्या प्रकरणात त्या दोषी आढळू  आल्या आहेत. त्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्‍यात आली आहे. दक्षिण कोरियाच्या पार्लिमेंट कोर्टाने पार्क गेन-हुई यांच्याविरोधात निकाल दिला आहे. 

दक्षिण कोरियाच्या इतिहासात पहिलीच घटना...
दक्षिण कोरियाच्या इतिहासात अशा प्रकारची ही पहिलीच घटना आहे. पार्क गेन-हुई यांना डिसेंबर 2016 मध्ये सर्व अधिकारातून बेदखल करण्यात आले होते. त्यांच्याविरोधात महाभियोग चालवण्यात आला होता. आता संसदीय न्यायालयाने पार्क यांच्या विरोधात निकाल दिल्याने त्यांना पदावरून हटवण्यात आले आहे.

६० दिवसांत नवा राष्ट्राध्यक्ष...
पुढील ६० दिवसांमध्ये नवा राष्ट्राध्यक्ष निवडला जाणार असून, मून जे इन यांना राष्ट्राध्यक्षपदाची संधी मिळण्याची शक्यता आहे. मिंजो पक्षाचे विरोधीपक्षनेते म्हणून २०१५ ते २०१६ या कालावधीत मून जे इन यांनी काम पाहिले आहे.

भ्रष्टाचाराचे धागेदोरे...
- पार्क गेन-हुई यांचे भ्रष्टाचार प्रकरण समोर आल्याने दक्षिण कोरियामध्ये एकच खळबळ उडाली होती.
- या प्रकरणाचे धागेदोरे राष्ट्राध्यक्षांचे निवासस्थान ब्लू हाऊसपासून ते सॅमसंग कंपनीचे प्रमुख, ज्येष्ठ वकील आणि देशाच्या निवृत्ती वेतन विभागाच्या प्रमुखांपर्यंत पोहोचले असल्याचे उघड झाले आहे.
- विद्यापीठांमध्ये प्रवेशसाठी लाच प्रकरणामूळे पार्क गेन-हुई यांच्याविरोधात वातावरण तापले आहे. 
- या प्रकरणात लाखो डॉलर्सचा भ्रष्टाचार झाल्याने संपूर्ण व्यवस्थाच सामान्य माणसाच्या विरोधात असल्याची भावना दक्षिण कोरियन नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.

उत्तर आणि दक्षिण कोरियात तणाव...
- उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया यांच्यातील संघर्ष तीव्र होत असतानाच दक्षिण कोरियामध्ये राजकीय घडामोडी वेगाने घडत आहेत. 
- उत्तर कोरियाकडून वारंवार क्षेपणास्त्रांची चाचणी केली जात आहे. यामूळे उभय देशांमधील तणाव वाढत चालला आहे.
- अमेरिकेकडून दक्षिण कोरियामध्ये क्षेपणास्त्राविरोधी यंत्रणा बसवण्यात आली आहे.  
- दक्षिण कोरियाच्या संरक्षणासाठी अमेरिकेने या भागात हस्तक्षेप केल्याने चीन संताप व्यक्त करत आहे.
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...