आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

उत्तर कोरियाला घाबरले हे शत्रू राष्ट्र, जीव वाचवण्याची अशीही तयारी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - उत्तर कोरिया आणि हुकूमशहा किम जोंग उनच्या धमक्यांना रटाळ म्हणता-म्हणता शत्रू राष्ट्र दक्षिण कोरिया आता घाबरायला लागले आहे. उत्तर कोरियाकडून हल्ला झाल्यास आपला जीव कसा वाचवता येईल याची तयारी दक्षिण कोरिया करत आहे. लोक घरातच तळघर बांधत आहेत. तर लष्कर रासायनिक हल्ल्यांपासून सुरक्षित राहण्यासाठी मॉक ड्रिल घेत आहेत. हेच सैनिक नागरिकांना सुद्धा युद्धात आणि रासायनिक हल्ल्यात कसा जीव वाचवता येईल याच्या सूचना देत आहेत. 

 

> उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरियाची सीमा जगातील सर्वात कडेकोट सीमा म्हणूनही ओळखली जाते. याच सीमेवर राहणारे वू जोंग कधीतरी दोन्ही देशांचे संबंध सामान्य होतील याची प्रतीक्षा करत आहेत. 
> याच्या घराभोवती आठवड्याचे 7 दिवस आणि दिवसाचे 24 तास हजारो सैनिक बंदूका घेऊन फिरत असतात. घराच्या डावीकडे आणि उजवीकडे दोन्ही देशांचे मिसाइल एकमेकांवर मिसाइल तैनात करून आहेत. 
> युद्ध पेटताच दोन्ही देश आक्रमण करतील. सैनिक किती मारले जातील हा नंतरचा प्रश्न... हल्ला होताच वू जोंग आणि त्यांच्या शेजाऱ्यांची घरे या दोन्ही देशांच्या हल्ल्यात बेचिराख होतील हे निश्चित आहे.
> अशात वू आणि त्यांच्या शेजाऱ्यांनी आपल्या घराखाली सुरक्षित तळघर बांधले आहे. हल्ला होताच हे लोक त्या घरात जाऊन लपतील. हे तळघर प्रत्यक्षात सिमेंट काँक्रीटचे बंकर आहेत. 
> वारंवार उत्तर कोरियाच्या अण्वस्त्र आणि बॅलिस्टिक मिसाइल चाचण्यांवरून युद्धाची शक्यता दिवसेंदिवस बळावत आहे. त्याचप्रमाणे, येथील स्थानिकांची भिती देखील वाढत आहे. 

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, जगातील सर्वात कडेकोट सीमेवर जीव मुठीत धरून जगणाऱ्या लोकांचे फोटोज...

बातम्या आणखी आहेत...