आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • South Says North Korea Earthquake Appears To Be Man Made

नॉर्थ कोरियाने टेस्ट केलेला हायड्रोजन बॉम्ब अणूबॉम्बपेक्षाही अधिक विध्वंसक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सेऊल - नॉर्थ कोरियाने प्रथमच हायड्रोजन बॉम्बची चाचणी केली आहे. त्या पार्श्वभूमीवर नॉर्थ-साऊथ कोरियाच्या काही भागांमध्ये भूकंपाची स्थिती निर्माण झाली होती. या घटनेनंतर संयुक्त राष्ट्र परिषदेने तातडीची बैठक बोलावण्यात आली होती. साऊथ कोरियानेही बैठक घेतली. 8 जानेवारीला नॉर्थ कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उनचा वाढदिवस आहे. ही चाचणी म्हणजे त्याच्यासाठी बर्थ डे गिफ्ट समजले जात आहे.

अशी असते हायड्रोजन बॉम्बची शक्ती...
- हायड्रोजन बॉम्ब अणुबॉम्बच्या तुलनेत 1000 पटीने अधिक शक्तीशाली असतो. त्याला थर्मो न्युक्लिअर बॉम्बही म्हटले जाते. बम भी कहा जाता है।
- आकारात हा बॉम्ब अणुबॉम्बपेक्षाही छोटा अशतो. त्याला क्षेपणास्त्रामध्ये वापरणे सोपे असते.
- हायड्रोजन किंवा थर्मोन्युक्लियर बॉम्बमध्ये फ्युजन चेन रिअॅक्शन होते. त्यात हायड्रोजनच्या आयसोटोप ड्युटीरियम आणि ट्राइटिरियमचा वापर होतो.
- न्यूक्लिअर्सच्या फ्युजन रिअॅक्शनने ब्लास्ट होतो. त्यासाठी सुमारे 500,00,000° सेंटीग्रेड तापमानाची गरज असते.
- फ्युजनमधून हीट आणि हाय पॉवर किरणे निघतात. ती हायड्रोजनला हेलियममध्ये परावर्तित करतात.
झाला भूकंप
नॉर्थ कोरियाने पहिल्या हायड्रोजन बॉम्बची चाचणी केली आहे. त्यामुळे नॉर्थ-साऊथ कोरियाच्या काही भागाला भूकंपाचे धक्के जाणवल्याची बातमी आहे. नॉर्थ कोरियाच्या राष्ट्रीय वाहिणीच्या वृत्तानुसार, बुधवारी सकाळी दहा वाजता (स्थानिक वेळेनुसार) हायड्रोजन बॉम्बची चाचणी घेण्यात आली. पुन्गेय-री येथे याआधी अणुचाचणी करण्यात आली होती. 8 जानेवारी रोजी नॉर्थ कोरियाचा सर्वेसर्वा किम जोंग याचा वाढदिवस आहे.

कुठे सुरु आहे नॉर्थ कोरियाचे अण्वस्त्र निर्माण
- यांगयोन न्यूक्लिअर रिसर्च सेंटर हे नॉर्थ कोरिया आणि यूएसएसआर (आता रशिया) यांच्यात झालेल्या करारानंतर 1950 मध्ये तयार करण्यात आले होते. येथेच नॉर्थ कोरिया अणु आणि हायड्रोजन बॉम्ब तयार करत आहे.
- यावर 1961 मध्ये काम सुरु झाले आणि 1964 मध्ये ते तयार झाले. या सेंटरवर जवळपास 3321 कोटी रुपये (1962 मध्ये यूएस डॉलरच्या किंमतीनुसार) खर्च झाले होते.
- नॉर्थ कोरियाच्या न्यूक्लिअर रिसर्च आणि डेव्हलपमेंटमध्ये या सेंटरला विशेष महत्त्व आहे.
- हे सेंटर जनरल डिपार्टमेंट ऑफ अॅटोमिक अॅनर्जीच्या चार महत्त्वाच्या अणूसंशोधन संस्थांपैकी एक आहे. उर्वरित तीन संस्थांमध्ये आयसोटोप अॅप्लिकेशन कमिटी, द अॅटोमिक अॅनर्जी कमिटी आणि प्योंगयांग अॅटोमिक अॅनर्जी यांचा समावेश आहे.

काय असतो हायड्रोजन बॉम्ब
हायड्रोजन किंवा थर्मोन्यूक्लिअर बॉम्बमध्ये साखळी रिअॅक्शन फ्यूजन असते. याची शक्ती अणूबॉम्ब पेक्षा कित्येक पटींनी अधिक असते.
- नॉर्थ कोरियाने 2006, 2009 आणि 2013 मध्ये अणूबॉम्बची चाचणी केली होती.

कुठे आला भूकंप
- यूएस जियोलॉजिकल सर्वेच्यानुसार, बुधवारी सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले.
- नॉर्थ कोरियाच्या न्यूक्लिअर टेस्ट सेंटरच्या जवळ पुन्गेय-री येथे बुधवारी सकाळी भूकंपाचे धक्के बसले.
- भूकंपाची तीव्रता 5.1 रिश्टर स्केल होती.

चीन - जपान काय म्हणाले
- जपान सरकारच्या प्रवक्त्याने म्हटले, 'मागील अनुभव पाहाता नॉर्थ कोरियात भूकंपाचे जे धक्के जाणवले ते न्यूक्लिअर टेस्टमुळे आहेत.'
- जपान सरकारचे अधिकारी योशिहिदे सुगो यांनी सांगितले, 'सरकार भूकंपाच्या धक्क्यांशी संबंधित माहिती गोळा करत आहे. यासंबंधी बैठक बोलवण्यात आली आहे.'
- त्याआधी चीनी अधिकाऱ्यांनी शंका व्यक्त केली की न्यक्लिअर टेस्टमुळे भूकंपाचे धक्के जाणवले.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, संबंधित फोटोज...