आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

२० वर्षांपासून माता-पित्यांत अबाेला, मुलांनी टीव्ही शोमध्ये घडवून आणली भेट... पित्याने मानले आभार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टोकियो- पती-पत्नीमध्ये कुरबुरी होणे हे नवीन नाही. कधी कधी या कुरबुरी वाढून वाद विकोपाला जातो. जपानमधील अशाच एका दांपत्याने वीस वर्षे अबोला धरला. या दोघांत संवाद घडवून आणला त्यांच्या मुलांनी. मुलांनी एका टीव्ही चॅनलला ही माहिती दिल्यावर या चॅनलने पती-पत्नीस लाइव्ह शोसाठी वेगवेगळे निमंत्रण पाठवले. दोघांची एका उद्यानात समोरासमोर भेट झाली व पतीचे मन:परिवर्तन झाले.
 
ओटोयू आणि त्याच्या पत्नीची ही कथा. दोघांना तीन मुले आहेत. ओटोयू पत्नीवर नाराज होता. कारण होते मुलांचे. पत्नी आपल्यासाठी वेळच देत नाही, अशी त्याची तक्रार होती. यावरून सतत भांडणे होत. नंतर अबोला सुरू झाला. मुलांशी मात्र त्याचे बोलणे सुरू होते. आता मुलेही मोठी झाली होती. त्यांनी आई-वडिलांमध्ये समेट घडवण्यासाठी त्यांनी एका टीव्ही चॅनलची मदत घेतली. लाइव्ह शोमध्ये पती-पत्नी समाेरासमोर आलेे. पती ओटोयूने पुढे होत २० वर्षांनंतर पत्नीशी संवाद साधला... तो म्हणाला, ‘इतकी वर्षे तू मला साथ दिलीस त्याबद्दल धन्यवाद. हे सारे सहन करून तू आता खूप कठोर झाली आहेस. यानंतर मी तुझ्याशी बोलत राहीन. मला आशा आहे, तू मला साथ देशीलच...’ पतीचे हे उद््गार ऐकून पत्नीचे डोळे भरून आले.
बातम्या आणखी आहेत...