आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्पेन, पोर्तुगालच्या जंगलात भीषण आगीत 30 ठार; या वर्षी आगीच्या घटनांत वाढ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माद्रिद- पोर्तुगाल व स्पेनच्या जंगलात भीषण आग लागली आहे. पोर्तुगालमध्ये आगीने २७ जणांचा मृत्यू झाला. स्पेनच्या वायव्येकडील गॅलिसिया भागात १७ ठिकाणी लागलेल्या आगीत ३ जणांचा मृत्यू झाला.  

गॅलिसियाची आग विगो या स्पेनमधील सर्वाधिक लोकसंख्येच्या शहरांत चहूकडे पसरली. तेथील विद्यापीठातील कॉलनी रिकामी करण्यात आली आहे. शाळांना सुटी देण्यात आली आहे. पोर्तुगालमध्ये ओफेलिया चक्रीवादळामुळे वेगवान वारे वाहत असून त्यामुळे आग वेगाने पसरली. पोर्तुगालचे पंतप्रधान अँटोनिओ कोस्टा यांनी हे संकट असल्याचे जाहीर केले आहे.  

पोर्तुगालच्या मध्य आणि उत्तर भागातील २६ ठिकाणी आग पसरली आहे. ती विझविण्यासाठी अग्निशमन दलाचे ३७०० कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. नागरिक सुरक्षा संस्थेचे प्रवक्ते पॅट्रिसिया गास्पर यांनी सांगितले की, आग लागल्यामुळे तीन प्रमुख रस्ते बंद करण्यात आले आहेत. आगीमुळे पोर्तुगालमध्ये तापमान सरासरीपेक्षा जास्त झाले आहे.  

युरोपीय देशांत या वर्षी आगीच्या घटनांत वाढ
युरो न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, युरोपीय देशांत गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी आगीच्या घटना दुप्पट झाल्या आहेत. या वर्षी आतापर्यंत आगीच्या १६७१ घटना घडल्या आहेत. गेल्या आठ वर्षांत आगीच्या घटनांचे प्रमाण दरवर्षी सरासरी ६३९ आहेत. पर्यावरणतज्ज्ञांच्या मते, तापमानात झालेल्या वाढीमुळे आगीच्या घटना वाढत आहेत. 
बातम्या आणखी आहेत...