आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : 7000 कोटींचे हे विमानतळाचा विकले गेले अवघ्या 7 लाखांत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माद्रीद - स्पेनचे एक एअरपोर्ट अगदी कवडीमोल भावात विकले गेले आहे. सुमारे 7,000 कोटी रुपये खर्च करून तयार करण्यात आलेले क्युडियाड रिअल एयरपोर्ट केवळ 10 हजार युरो (सुमारे 7 लाख रुपये) एवढ्या किमतीतल विकले गेले. एका चिनी कंपनीने लिलावात याची खरेदी केली. स्पेनमध्ये या विमातळाला भुताटकी असलेले विमातळ असेही म्हटले जाते.

या एअरपोर्टच्या लिलावासाठी बेस प्राइज 10 कोटी युरो ठरवण्यात आली होती. पण एकाही कंपनीने त्यावर बोली लावली नाही, त्यामुळे ही बेस प्राइज 8 कोटी युरो आणि नंतर 4 कोटी युरोवर आणण्यात आली. त्यानंतरही कोणीही यात रस दाखवला नाही. त्यामुळे अखेर एका चिनी कंपनीने बोली लावत या विमानतळाची खरेदी केली. जानीन इंटरनॅशनल या चिनी कंपनीच्या मते चीनी कंपन्यांच्या युरोप प्रवेशासाठी या विमातळाचा वापर केला जाणार आहे.

क्युडियाड रिअल एअरपोर्ट हे स्पेनमध्ये विकासकामे अत्यंत वेगात सुरू असताना हे विमानतळ तयार करण्यात आले होते. त्यावेळी यासाठी 7, 600 कोटी रुपये लागले होते. पण चार वर्षांतच हवी तेवढी विमान वाहतूक होत नसल्याने याठिकाणचे कामकाज ठप्प झाले. 2008 मध्ये एअरपोर्ट सुरू करण्यात आले. 2010 मध्ये आंतरराष्ट्रीय उड्डाणेही सुरू करण्यात आली. पण विमान कंपन्यांना आकर्षित करण्यात यश आले नाही, त्यामुळे अखेर 2012 मध्ये ते बंद करावे लागले.

पुढील स्लाइड्सवर पाहा, या विमानाचे PHOTOS
बातम्या आणखी आहेत...