आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्‍पॅनिश वृत्‍तपत्राने शीख युवकाला दाखवले पॅरिस हल्‍ल्‍यातील दहशतवादी, नंतर मागितली माफी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रकाशित केलेला फोटो आणि मूळ फोटो - Divya Marathi
प्रकाशित केलेला फोटो आणि मूळ फोटो
टोरंटो (कॅनाडा) - कॅनाडातील एक शीख युवक पॅरिसमधील हल्‍ल्‍यात सहभागी असल्‍याचे चुकीचे वृत्‍त स्पेनमधील सर्वात मोठ्या वृत्‍तपत्रापैकी एक असलेल्‍या ‘लॉ रेजां’ या वृत्‍तपत्राने प्रकाशित केले. मात्र, आपली चूक लक्षात येताच या वर्तमानपत्राने माफी मागितली. फ्रान्‍सची राजधानी पॅरिसमध्‍ये 13 नाव्‍हेंबरच्‍या रात्री दहशतवाद्यांनी सात ठिकाणी हल्‍ले केले. यात 129 लोक ठार झाले. त्‍यामुळे या हल्‍ल्‍यात सहभागी असलेले आणि 'इसिस' या दहशतवादी संघटनेशी निगडित व्‍यक्‍तींचा शोध घेतला जात आहे.
फोटोशॉपच्‍या मदतीने वीरेंद्रला दाखवले दहशतवादी
‘लॉ रेजां’ ने शनिवारी कॅनडामध्‍ये राहणा-या वीरेंद्र जुबाल या शीख युवकाचा फोटो छापला. शिवाय, 'पॅरिसवर हल्‍ला करणा-यांपैकी एक दहशतवादी' अशी त्‍या खाली फोटो ओळसुद्धा दिली. हे वृत्‍तपत्र मॅड्रिड येथून प्रकाशित होते. त्‍याने दिलेल्‍या वृत्‍तात म्‍हटले, दहशतवादी तीन तुकड्यात होते. ते फ्रान्‍समध्‍ये घुसले. यातील एक सीरियन शरणार्थी म्‍हणून तुर्कस्‍तानात घुसला होता. ते सर्व 15 ते 18 वर्षे वयोगटातील होते वीरेंद्र याच्‍या फोटोसोबत फोटोशॉपमध्‍ये छेडछाड करून तो छापला. यामध्‍ये वीरेंद्र याच्‍या हातात एक धार्मिक पुस्‍तक आणि अंगावर सुसाइड जॅकेट दाखवले.

नंतर काय झाले ?
सोशल मीडियावर वीरेंद्र यांचा फोटो वायरल होताच त्‍याने आपला ओरिजिनल फोटो सोशल साइट्स मीडियावर टाकला. त्‍याखाली त्‍याने लिहिले की, पॅरिस दहशतवादी हल्‍ल्‍यासोबत त्‍यांचे काहीच देणे घेणे नाही. नंतर वृत्‍तपत्राने रविवारी माफीनामा प्रकाशित केला. वीरेंद्र याच्‍या फोटोसोबत कुणी छेडछाड केली, याचा तपास लागू शकला नाही.