आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विशेष अॅप: एका सेल्फीतून कळेल पॅन्क्रियाटिक कॅन्सर आणि हेपेटायटिस होण्याची शक्यता किती?

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन- आता स्मार्टफोनने सेल्फी घेऊन पॅन्क्रियाटिक कॅन्सर, हेपेटायटिस आणि गिलबर्ट सिंड्रोमच्या प्रारंभिक लक्षणांची माहिती मिळू शकेल. अमेरिकी शास्त्रज्ञांनी याासाठी एक असे सेल्फी अॅप तयार केले आहे जे डोळ्यातील बिलिरुबिनचे प्रमाण सांगते. बिलिरुबिन  पित्ताशयात आढळते. यासंबंधीच्या आजारात डोळ्यांतील पांढरा भाग पिवळा दिसू लागतो. विशेषत: पॅन्क्रियाटिक कॅन्सरमध्ये हे प्रमुख लक्षण असते. डोळ्यातील हे पिवळे प्रमाण सहज दिसून येत नाही. म्हणूनच ते प्रमाण वाढल्यावरच आजाराचे निदान हाेते. तोपर्यंत रुग्णाची वाचण्याची शक्यता कमी असते. पॅन्क्रियाटिक कॅन्सर घातक रोग आहे. यात रुग्णाची वाचण्याची शक्यता केवळ ९ टक्के असते. फार तर रुग्ण पाच वर्षे जिवंत राहू शकतो.
 
हे अॅप युनिव्हर्सिटी ऑफ वॉशिंग्टनच्या शास्त्रज्ञांनी तयार केले आहे. पहिल्या क्लिनिकल ट्रायलमध्ये ते ८७% यशस्वी ठरलेे. या चाचणीत ७० % रुग्णांची या अॅपने तपासणी करण्यात आली. या अॅपचे सप्टेंबरमध्ये हवाईमध्ये लाँचिंग होत आहे. या अॅपमुळे पॅन्क्रियाटिक कॅन्सरमुळे होणारे मृत्यू कमी होतील, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. आतापर्यंत बिलिरुबिनचे प्रमाण जाणून घेण्यासाठी केवळ ब्लड टेस्ट हेच माध्यम होते. ही महागडी ब्लड टेस्ट करणे शक्य होत नसे.

सेल्फी अॅप असे काढते निष्कर्ष
बिलिस्क्रीन एक सेल्फी अॅप आहे. स्मार्टफोनमध्ये हे अॅप वापरता येते. या अॅपमध्ये शास्त्रज्ञांनी कॉम्प्युटर व्हिजन सिस्टिमचा वापर केला असून फोटोतील डोळ्यांच्या पांढऱ्या भागावरून हे अॅप बिलिरुबिनचे प्रमाण सांगते. शास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या परिस्थितीत उपयोगी दोन अॅसेसेरीजही दिल्या आहेत. यात पेपर ग्लासेस आणि थ्रीडी प्रिंटेड बॉक्स आहेत.

वडिलांचा याच आजारामुळे मृत्यू म्हणून तयार केले अॅप
बिलिस्क्रीन अॅपच्या पथकाचे को-ऑथर डॉ. जिम टेलर यांच्या पित्याचे पॅन्क्रियाटिक कॅन्सरने निधन झाले होते. जिम यांच्या मते, हा अत्यंत दुर्धर आजार आहे. याची लक्षणे सहज दिसत नाहीत. पित्याचा मृत्यूनंतर या आजारापासून जगातील जास्तीत जास्त लोकांची सुटका व्हावी, त्यांना लवकर निदान करून उपचार करता यावेत म्हणून हे अॅप तयार केले असल्याचे डॉ. जिम यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...