आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनियंत्रित पोर्श कारचे झाले तुकडे, मात्र प्रवाशी सुखरुप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नोवोसीबिर्स्क - रशियाच्या नोवोसीबिर्स्क शहरातील एक वेगवान पोर्श कार भयानक अपघाताची शिकार झाली. मात्र कारच्या आतील लोकांना कोणतीही इजा झालेली नाही. या घटनेची सीसीटीव्ही फुटेजमध्‍ये तीव्रता पाहावयास मिळते. न‍ियंत्रण नसलेली कार रस्त्यावर घसरुन पुलाच्या खालील भ‍िंतीला धडक दिली. दरम्यान ती हवेत पलटून रस्त्यावर पडली. या घटनेत कारचे तुकडे-तुकडे झाले. घटनेची व्ह‍िडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
दुसरीकडे बचावासाठी पोहोचलेला चमू कारमधील चालक आणि महिलेला सुरक्षित पाहून आश्‍चर्यचकित झाले. चमूमधील सदस्यांनी सीट कापून कारमध्‍ये फसलेल्या महिला आणि चालकाला बाहेर काढले. त्यांना थोडीशी इजा झाली आहे. या घटनेने चालकाला मोठा धक्का बसला आहे. पोल‍िसांच्या म्हणण्‍यानुसार सैबेरिया शहरातील रस्ता घसरणार असल्याने चालकाचे आपल्या कारवरील नियंत्रण सुटते. यामुळे ही घटना घडली आहे.

पुढील स्लाड्सवर पाहा, या भयानक कार दुर्घटनेची छायाचित्रे...