आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न्यूयॉर्कमध्ये 'स्पाइडरमॅन' ने केली रोड रोमियोची धुलाई, VIDEO व्हायरल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूयॉर्क - टाइम्स स्क्वेअरवर गुरुवारी एक अनोखा प्रकार पाहायला मिळाला. याठिकाणी सुपरहिरो स्पायडरमॅनचा ड्रेस परिधान केलेल्या व्यक्तिने एका रोड रोमियोची चांगलीच धुलाई केली.
यावेळी उपस्थित असलेला एक प्रत्यक्षदर्शी जिओफ गोल्डबर्ग ने सांगितले की, एक व्यक्ती त्याठिकाणी अनेक लोकांना त्रास देत होता. तसेच छेडछाड करण्याचा प्रयत्नही करत होता. तेवढ्यात स्पायडरमॅनचा ड्रेस परिधान केलेला व्यक्ती त्याठिकाणी आला आणि त्याने त्याची चांगलीच धुलाई केली. या 'स्पाइडरमॅन'ने रोड रोमियोला मारण्यास सुरुवात करताच, त्याठिकाणी असलेले लोकही त्याचे प्रोत्साहन वाढवू लागले होते. या 'स्पाइडरमॅन' ने रोड रोमियोला लाथा बुक्क्यांनी चांगलाच धडा शिकवला. एका प्रत्यक्षदर्शीने ट्विटरवर त्याचा व्हिडिओ शेअर केला. या स्पायडरमॅनला सुपरपॉवरची गरज नाही, असे त्याने लिहिले. हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.
बातम्या आणखी आहेत...