आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Spinal Transplant Hailed As Breakthrough For Chronic Pain Treatment

कंबरदुखीवर जालीम उपाय, साठीतील वृद्धाला बसवले पहिले डिव्हाइस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिडनी- जीवनाच्या गतीलाच ब्रेक लावणाऱ्या कंबरदुखीवरही रामबाण उपाय सापडला आहे. ऑस्ट्रेलियातील डॉक्टरांनी त्यावर प्रभावी व सोपा उपाय शोधला. त्यात एक छोट्याशा इंटेलिजन्स डिव्हाइसचे पाठीच्या मणक्यात प्रत्यारोपण केले जाते. हे डिव्हाइस असह्य वेदना शून्य पातळीवर घेऊन येते. कंबरदुखीने त्रस्त व्यक्तीचे पेनकिलर औषधींवरील अवलंबित्व कमी होईल व मोठा डोस घेण्यातूनही सुटका होईल. हा या डिव्हाइसचा मोठा फायदा आहे.


सिडनीच्या रॉयल नॉर्थ शोअर हॉस्पिटलमध्ये मंगळवारी या पहिल्या डिव्हाइसचे प्रत्यारोपण करण्यात आले. विशेष म्हणजे भारतीय वंशाचे ६० वर्षीय जसवीर ग्रेवाल यांना हे डिव्हाइस बसवण्यात आले. ग्रेवाल हे ३० वर्षांपासून कंबरदुखीने त्रस्त होते. पेनकिलरचा मोठा डोस घेतल्याशिवाय हलणेही त्यांना अशक्य होते. प्रत्यारोपणानंतर मात्र चमत्कारच झाला. शस्त्रक्रियेनंतर ८० ते ८५ % वेदना कमी झाल्या, असे ग्रेवाल म्हणाले. हे प्रत्यारोपण यशस्वी करणारे डॉक्टर चार्ल्स ब्रुकर म्हणाले की, कंबरदुखीवरील उपलब्ध उपचारांत हा अत्याधुनिक उपचार आहे. हे डिव्हाइस मणक्यात कायम प्रत्यारोपित होते.

शरीराच्या हालचालीनुसार ते स्वत:ची स्थिती बदलते. त्यामुळे चालताना, बसताना किंवा झोपताना त्याच्या कार्यक्षमतेवर कोणताही फरक पडत नाही.
हळुवार मालिश केल्यासारखी अनुभूती

1 कंबरेच्या कोणत्याही भागात वेदना झाल्यास तेथून सिग्नल निघून मणक्याच्या माध्यमातून मेंदूमध्ये पोहोचतात.
2 मणक्यात लावलेले डिव्हाइस सिग्नल पकडते. ते येण्याचा मार्ग व वेदनेची तीव्रता याची नोंद हे डिव्हाइस घेते.
3 वेदनेच्या तीव्रतेनुसारच डिव्हाइस व्हायब्रेशनचे तरंग थेट कमरेमध्ये वेदना होत असलेल्या जागेवर पाठवून देते.
4 हे तरंग वेदनेच्या ठिकाणी पोहोचताच वेदना जाणीव संपुष्टात येते. गुदगुल्या किंवा मालिश केल्याची अनुभूती येते.