आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS: इंजिनाजवळ एअर होस्टेसचे फोटोसेशन, प्रवाशांनी केली तक्रार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिकागो - अमेरिकेतील शिकागो येथील स्पिरिट एअरलाइन्सच्या एका फ्लाइट अटेंडंडला विमानासमोर उभे राहुन फोटोसेशन करणे अंगलट आले आहे. प्रवाशांनी प्रशासनाकडे तक्रार केल्यानंतर कंपनीने फ्लाइट अटेंडंडच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. एअरलाइन्स इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्यांसाठी ही नित्याची बाब समजली जाते, मात्र कंपनीने प्रवाशांच्या दबावात चौकशी समिती नेमली आहे.
फ्लाइट अटेंडंड एरिका पेज होहेयर अंतरराष्ट्रीय विमानतळावर उभ्या असलेल्या विमानाच्या समोरील ब्लेडवर इंजिनसमोर उभे राहून फोटो काढत होती. फोटोसाठी ती एकानंतर एक पोज देत होती, हे पाहून प्रवाशांना आश्चर्य वाटले. त्यांनी फ्लाइट अटेंडंडचे फेसबुक पेज तपासले तेव्हा तिथे तिचे याच अंदाजात अनेक छायाचित्रे होती. प्रवाशांनी प्रशासनाशी संपर्क करुन सुरक्षेच्या दृष्टीने हे योग्य नसल्याचे सांगत एरिका विरोधात तक्रार दिली आणि कारवाईची मागणी केली.
एरिकाचे स्पष्टीकरण
या घटनेनंतर एरिकाने स्थानिक माध्यमांना सांगितले, की सोशल मीडियावरील माझ्या फोटोज् बद्दल मला काहीच माहित नाही. याबद्दल मी आताच काही सांगू शकत नाही. मात्र काही वेळानंतर तिच्या फेसबुक पेजवरुन ते फोटो काढून टाकण्यात आले आणि अकाउंट देखील डिलीट करण्यात आले.
कंपनी विरोधात, सहकारी सोबत
स्पिरिट एअरलाइन्सचे प्रवक्ते पॉल बेरी म्हणाले, ज्या पद्धतीने फोटो घेण्यात आले, ते कंपनीच्या नियमांविरोधात आहे. या प्रकरणी कंपनी तपास करत असून योग्य ती कारवाई करेल. त्याचवेळी फ्लाइट अटेंडंडच्या बाजूने तिचे सर्व सहकारी उभे राहिले आहेत. त्यांचे म्हणणे आहे, की ही छायाचित्रे एअरलाइन्ससोबत काम करण्याच्या आठवणी आहेत. कंपनीने अशा छायाचित्रांना विरोध केल्यानंतर कर्मचाऱ्यांनी त्यांची स्वतःची छायाचित्रे शेअर करण्यास सुरुवात केली आहे.

पुढील स्लाइडमध्ये पाहा, एरिका पेज आणि एअरलाइन्स इंडस्ट्रीतील इतरांचे फोटोसेशन
बातम्या आणखी आहेत...