आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

श्रीलंकेत आजही जिवंत आहे रावणाची बहिण शुर्पणखा, करते भविष्यवाणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गंगा यांचा दावा आहे की त्या सूर्पणखाचा अवतार आहे. - Divya Marathi
गंगा यांचा दावा आहे की त्या सूर्पणखाचा अवतार आहे.
इंटरनॅशनल डेस्क - आजपर्यंत शुर्पणखाचे किस्से आणि कथा तुम्ही वाचल्या किंवा ऐकल्या असतील. मात्र श्रीलंकेची एक महिला शुर्पणखाचा अवतार असल्याचा दावा करत आहे. गंगा सुदर्शनी नावाच्या या महिलेचा दावा आहे की भविष्यात होणाऱ्या घटनांचा त्यांना आधीच आभास होतो. त्यांना ही दैवी देणगी लाभली असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. याचा उपयोग त्या लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी करतात.
अॅक्ट्रॉलॉजर नाही भविष्यवेत्ता
- गंगा यांचे म्हणणे आहे की मी अॅस्ट्रॉलॉजर नाही. कारण मी त्याचा अभ्यास केलेला नाही. मी भविष्यवाणी करु शकते.
- गंगा सांगतात, की त्यांना लहानपणापासूनच भविष्यात घडणाऱ्या घटनांचे आभास होतात, आणि त्या घटना खरोखर घडतात.
- गंगा यांचा दावा आहे आजपर्यंत त्यांची भविष्यवाणी खोटी ठरलेली नाही. भविष्य सांगण्यासाठी त्यांना फक्त व्यक्तीचे नाव आणि जन्माची माहिती आवश्यक असते.
- गंगा म्हणातात की भविष्यातील बऱ्या किंवा वाईट अशा दोन्ही प्रकारच्या घटनांचा आभास होता.
- गंगा यांच्या भविष्यवाणीची प्रचिती सर्वप्रथम 1974 मध्ये आली होती. मार्टिन एअर फ्लाइट डीसी-8 क्रॅश झाले होते आणि त्यात 191 जणांचा मृत्यू झाला होता. याबद्दल गंगाने आधीच सांगितले होते.
- श्रीलंकेमध्ये गंगा एखाद्या व्हिव्हिआयपीसारख्या राहातात. राजकारण्यांसह धार्मिक आणि इतर सर्वच क्षेत्रातील लोक त्यांचा सल्ला घेण्यासाठी येत असतात.
- याबद्दल गंगा सांगतात की मला फॉलो करणारे लोक मला माते प्रमाणे मानतात. मी सांगितलेल्या मार्गाचा अवलंब करुन आयुष्यातील कठीण प्रसंगांचा सामना करतात.
- गंगा यांचे म्हणणे आहे की त्या त्यांच्या शक्तींचा वापर गरजू लोकांच्या मदतीसाठी करतात.

परंपरेने मिळालेली देणगी
- गंगा यांचे म्हणणे आहे की ही शक्ती वारसा स्वरुपात मिळाली आहे. अशीच शक्ती त्यांचे वडील अंगमपोडी अलाद्ददीन डी सोयसा यांना अवगत होती. ते आयुर्वेदिक उपचार करत होते.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, गंगा यांचे निवडक फोटो...
(Please Note - तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...