आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सागरमाला प्रकल्पासाठी श्रीलंकेचा भारताला पाठिंबा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोलंबो - भारताच्या महत्त्वाकांक्षी सागरमाला प्रकल्पात सहभागी होण्यासाठी श्रीलंकेने उत्सुकता दर्शविली आहे. या महत्त्वाकांक्षी सागरमाला प्रकल्पामुळे भारतातील ७,५०० किलोमीटरच्या समुद्रकिनाऱ्यासह जमिनीवरील अंतर्गत जलमार्ग तयार होणार आहेत. जे दक्षिण भारतातील चार राज्यांना अधिक जवळ जोडून सहकार्याचे नवे पर्व तयार होईल. यामुळे विभागातील उप-प्रादेशिक सहकार्यासह ५०० दशलक्ष अमेरिकन डॉलरची उलाढाल वाढून क्षेत्रातील अर्थव्यवस्थेला रोजगारासह चालना मिळेल, असे विधान श्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी केले आहे.

कोलंबो इंटरनॅशनल मेरिटाइम कॉन्फरन्समध्ये गुरुवारी बीजभाषण झाले. या वेळी उद्योगजगतातील मान्यवर उपस्थित होते. आपला इरादा स्पष्ट करताना विक्रमसिंघे म्हणाले की, याबाबतच्या काही बाबी-व्यवस्था व आराखडा अंतिम झाल्या आहेत. यामुळे श्रीलंकेच्या अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन मिळून श्रीलंका भारतीय सागरी क्षेत्रात एक आर्थिकदृष्ट्या सक्षम व तांत्रिकदृष्ट्या परिपूर्ण टेक्नॉलॉजी हब होईल. दक्षिणेतील चार राज्यांसह श्रीलंकेत यामुळे वाढत्या अर्थव्यवस्थेतून समृद्धी येईल. या प्रकल्पाबाबत प्रचंड उत्सुक असलेल्या विक्रमसिंघे यांनी या वेळी भारत-श्रीलंकेतील प्राचीन पौराणिक व ऐतिहासिक संबंधांना उजाळा देऊन केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूंशी असलेल्या संबंधाचाही उल्लेख केला.

श्रीलंकेसाठी हे फायद्याचेच : आम्ही या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी भारतापुढे नाविक, हवाई, संपर्कक्षेत्रासंह व्यापारी मोहिमांसाठी संपूर्ण सहकार्याचा हात पुढे केला आहे. सागरमाला प्रकल्पात सहभागी होणे श्रीलंकेसाठी एक मोठा फायदाच असेल. त्यात श्रीलंकेचा कुठलाच तोटा नाही, असेही रानिल विक्रमसिंघे म्हणाले.
बातम्या आणखी आहेत...