आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sri Lanka Visit: Tamil May Live Peaceful, Prestgious Manner Modi

श्रीलंका भेट: तमिळींना शांतता, सन्मानाने जगता यायला हवे - नरेंद्र मोदी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोलंबो । राष्ट्राध्यक्ष सिरिसेना यांनी आयोजित केलेल्या एका समारंभात बौद्ध भिक्खूंना नमन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी.
कोलंबो - २८ वर्षांचा दुरावा संपवताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारपासून श्रीलंकेच्या दौ-याला सुरूवात केली. तमिळ समुदायाला समानता, न्याय, शांतता आणि सन्मानाने जगता यायला हवे. त्यांचा हा ‘नवा प्रवास ’ आहे, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे. मोदी यांनी शुक्रवारी राष्ट्राध्यक्ष मैत्रिपाल सिरिसेना यांची भेट घेतली. त्याचबरोबर श्रीलंकेचे भविष्य घडवण्यासाठी सिरिसेना करत असलेल्या प्रयत्नांचेही मोदी यांनी कौतूक केले. त्याचबरोबर ‘एकात्मता आणि एकजूट’ राखली गेली पाहिजे. परंतु तमिळ समुदायाबद्दल भारताला जिव्हाळा आहे. तो पुढेही राहील. कारण समुदायाची मुळे भारताशी जोडलेली आहेत. आता या समुदायाचा नवा प्रवास सुरू झाला आहे, अशा शब्दांत मोदी यांनी समुदायाची पाठराखण केली. मोदी यांचे श्रीलंकेच्या
संसदेत भाषणही झाले. दिवंगत राजीव गांधी यांनी १९८७ मध्ये श्रीलंकेला भेट दिली होती. त्यानंतर श्रीलंकेला भेट देणारे मोदी पहिलेच पंतप्रधान ठरले. चीनकडून वाढलेली जवळीक आणि इतर कारणांमुळे द्विपक्षीय संबंधात गेल्या काही वर्षांत अनेक चढउतार आले होते. त्या पार्श्वभूमीवर मोदी यांची ही भेट महत्वाची मानली जात होती.

उभय देशांत चार करार
मोदी आणि सिरिसेना यांच्यात शिष्टमंडळस्तरीय चर्चा झाली. त्यात अर्थव्यवस्थेला चालना देणे, व्यापार व्यवहार सुलभ करणे, सीमा शुल्क सहकार्य या मुद्द्यांवर सहमती झाली. त्याबरोबरच व्हिसा नियमांत शिथिलता आणण्यावरही उभय नेत्यांमध्ये सहमती झाली. चर्चेनंतर दोन्ही नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषदे ही माहिती दिली.

मच्छीमारांच्या प्रश्नी दीर्घकालीन तोडगा
द्विपक्षीय चर्चेत मोदी यांनी मच्छीमारांचा मुद्दा उपस्थित केला. या मुद्द्यावर दोन्ही देशांनी मानवता आणि उदरनिर्वाह या दोन्ही पातळ्यांवर विचार केला पाहिजे. त्या दृष्टीने दीर्घकालीन तोडगा काढण्याचे प्रयत्न होण्याची गरज आहे. त्यानंतर हा प्रश्न सुटू शकेल.