आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीलंका लष्कर युद्ध गुन्हेगार, लिट्टेविरोधी अभियानावेळी तामिळींवर केले अत्याचार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोलंबो - श्रीलंकेतील सरकारी चौकशी आयोगाने लष्करावरील युद्ध गुन्ह्यांचे आरोप योग्य आणि विश्वासार्ह ठरवले आहेत. लष्कराने लिट्टे संघर्षावेळी तामिळ बंडखोरांना ठार करण्यासाठी हे गुन्हे केले. देशांतर्गत चौकशीमध्ये विदेशी न्यायाधीशांनाही समाविष्ट करून घेण्याची शिफारस संयुक्त राष्ट्र मानवी हक्क आयोगाने केली आहे. आयोगाने त्याचेही समर्थन केले आहे. आयोगाने श्रीलंकेच्या कायदा प्रणालीशिवाय युद्ध गुन्ह्यांसाठी न्यायालय स्थापन करण्याची शिफारस केली आहे.

माजी राष्ट्राध्यक्ष महिंदा राजपक्षे यांनी या आयोगाची स्थापना केली होती. निवृत्त न्यायाधीश मॅक्सवेल पारानागामा यांनी ऑगस्टमध्ये तयार केलेला १७८ पानी अहवाल संसदेत मांडला. यामध्ये युद्धाच्या अंतिम टप्प्यात लष्कराने तामिळ बंडखोरांवर युद्ध गुन्हे केल्याचे म्हटले आहे.

माहितीपट कपोलकल्पित नव्हता
ब्रिटिश वाहिनी चॅनल फोर आणि संयुक्त राष्ट्राने श्रीलंकेतील युद्धादरम्यान झालेल्या अत्याचारांवर दस्तऐवज आणि माहितीपट तयार केला आहे. चौकशीच्या आधी माहितीपट कपोलकल्पित असल्याचे लष्कराने म्हटले हेाते. मात्र, मॅक्सवेल पारानागामा यांनी मंगळवारी म्हटले की, सैनिकांवरील आरोप विश्वासार्ह होते. चॅनल फोरच्या नो फायर झोन वृत्तकथेत वापरलेले फुटेज खरे आहे. यामध्ये नग्न, डोळ्यांवर पट्टी बांधलेल्या आणि हात बांधलेल्या अवस्थेतील कैद्यांवर गोळ्या झाडलेल्या दाखवले आहे.
बातम्या आणखी आहेत...