आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीलंकेचे नवे राष्ट्रपती आज भारत भेटीवर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोलंबो - श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष मैत्रीपाल सिरिसेना आपल्या पहिल्या परराष्ट्र दौ-यावर रविवारी नवी दिल्लीत पोहोचतील. त्यांची ही तीन दिवसांची भारत भेट असेल. दोन्ही देशांत काही दिवसांपूर्वी आलेली कटुता दूर करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. दौ-यात ते बोधगया आणि तिरुपती बालाजीचेही दर्शन घेणार आहेत.

सिरिसेना यांच्यासमवेत त्यांच्या पत्नी जंयती सिरिसेनादेखील असतील. रविवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचतील. केंद्रीय रस्ते व जहाज राज्यमंत्री पी. राधाकृष्णन हे त्यांचे स्वागत करतील. सोमवारी राष्ट्रपती भवनात त्यांचे औपचारिक स्वागत होईल. ते राजघाटावरदेखील जातील. सोमवारी ते परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनाही भेटतील. त्यानंतर दुपारी सिरिसेना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत हैदराबाद हाऊसमध्ये चर्चा करतील. त्याच वेळी पंतप्रधानांकडून त्यांना लंच दिले जाईल. उभय देशांत काही करारही होतील. मंगळवारी सिरिसेना बोधगयेला जातील. तेथून नंतर तिरुपतीचे दर्शन घेतील. तिरुपतीहून ते मायदेशी परततील. करुणानिधी यांच्याशी चर्चा करणे गरजेचे नाही.