लास वेगास - अमेरिकेचा बॉक्सर मेवेदरने जगातील सर्वात मोठी फाईट जिंकली. त्याने फिलिपाईन्सच्या मॅनी पॅकियाओला 36 मिनिटांत पराभूत केले. त्यांची लढत एवढी बरोबरीची होती की, अखेरपर्यंत दोघेही
आपण विजयी झाल्याचेच समजत होते. पण तीन पंचांनी घेतलेल्या निर्णयानुसार मेवेदरला विजयी घोषित केले.
खासगी विमानांनी भरले पार्किंग
ही मॅच पाहण्यासाठी जगभरातून सेलिब्रिटींनी गर्दी केली होती. त्यापैकी बहुतांश सेलिब्रिटी चार्टर विमानाने आले होते. त्यासाठी लास वेगासच्या एमजीएम अरिना जवळचे प्रायव्हेट एअरपोर्ट खासगी विमानांनी खचाखच भरले होते. या एअरपोर्टवर सुमारे 125 खासगी विमाने आली होती.
6300 कोटींची मॅच
या मॅचद्वारे टिव्ही वाहिन्यांनी 6300 कोटी रुपयांची कमाई केली. 31.50 लाख लोकांनी इंटरनेटवर पैसे मोजून ही मॅच पाहिली. ज्या अरिनामध्ये ही मॅच होती त्याच्या अगदी समोरच्या हॉटेलमध्येही टिव्हीवर ही मॅच पाहण्यासाठी 25,000 हजार रुपयांचे तिकिट होते.
36 मिनिटांत 435 पंच मारून जिंकला मेवेदर
- मेवेदरच्या 435 पैकी 148 पंच अचूक निशाण्यावर म्हणजे 34%
- पॅकियाओने 429 पंच मारले, पण केवळ 81 निशाण्यावर म्हणजे, 19%
- 42.40 लाख रुपये प्रति सेकंद कमावले मेवेदरने.
- 1142 कोटी रुपये आणि 6 कोटींचा हिरेजडीत बेल्ट जिंकला.
- विजयाबरोबरच मेवेदरची संपत्ती आता 2700 कोटी रुपये झाली आहे.
सोशल मिडियावरही चर्चा
- लढतीनंतर ट्वीटरवर 34 लाख वेळा मेवेदरचे नाव आले.
- पॅकियाओच्या नावाचा उल्लेख अर्ध्यापेक्षाही कमी 16 लाख वेळा.
- अमेरिका, फिलिपाईन्ससह काही वेळ भारतातही टॉप ट्रेंडींगमध्ये होते मेवेदर-पॅकियाओ
पुढील स्लाइडवर पाहा, या सोहळ्यासाठी आलेले सेलिब्रिटी...