आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Staged ISIS Beheading Video Hacked From US Senator McCain Staffer

VIDEO शीर कापण्याचे ISIS चे व्हिडिओ बनावट, रशियाच्या हॅकर्सचा दावा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मॉस्को - दहशतवादी संघटना ISIS च्या दहशतवाद्यांकडून जारी केला जाणारा बंधकांचा शीर कापण्याचा व्हिडिओ बनावट असल्याचा दावा हॅकर्सनी केला आहे. 'सायबर बरकुट' नावाच्या एका प्रो रशियन हॅकर ग्रुपने हा दावा केला आहे. हे व्हिडिओ स्टुडिओमध्ये शूट केले जात असून अमेरिकेचीही यात हातमिळवणी असल्याचा धक्कादायक दावाही या ग्रुपने केला आहे. मात्र अमेरिका कशाप्रमाणे मदत करत आहे याबाबत मात्र काहीही स्पष्ट करण्यात आले नाही.
(हॅकर्सने जारी केलेला व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा वरील स्लाइडवर.)
हॅकर्सने पुरावा म्हणून एक व्हिडिओही जारी केला आहे. अमेरिकेच्या एका नेत्याच्या स्टाफच्या इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसमधून हा व्हिडिओ चोरल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र व्हिडिओची पडताळणी अद्याप झालेली नाही.

हॅकर्स ग्रुपचा दावा
हॅकर्स ग्रुपच्या मते जॉन मॅककेन यांच्या स्टाफमधील एकाचे डिव्हाइस हॅक केल्यानंतर त्यांना त्यात ISIS कडून शीर कापले जाण्याचा स्टेज्ड व्हिडिओ सापजला आहे. हॅकर्सने हा व्हिडिओ जून महिन्यात जॉन मॅककेन यांच्या युक्रेन दौऱ्या दरम्यान मिळवला असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. पुढल्या वेळी परदेश दौऱ्यावर जाताना गोपनीय कागदपत्रे बाळगू नका असा इशारा या हॅकर्सनी सिनेटर मॅककेन यांना दिला आहे.

व्हिडिओमध्ये काय?
हॅकर्स ग्रुपद्वारे जारी करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये ISIS चा चर्चित चेहरा असलेला जेहादी जॉनसारखा एक दहशतवादी काळे कपडे परिधान केलेला दिसतो आहे. तर नारंगी जंपसूटमध्ये एक बंधक दिसतो. स्टुडिओत इतरही काही लोक दिसत आहेत. ते हायडेफिनेशन कॅमे-याने व्हिडिओ शूट करताना दिसतात. जी फाइल आम्हाला मिळाली आहे, ती एवढी मौल्यवान आहे की, आम्हाला काहीही जास्त बोलण्याची गरजच नाही, असा हॅकर्सचा दावा आहे.

कोण आहेत मैककेन?
मॅककेन हे अमेरिकेचे सिनेटर असून, सिरियामध्ये अनेकदा मोठ्या दहशतवाद्यांना भेटलेले आहेत. सोशल मिडियावरही त्यांचे दहशतवाद्यांसोबतचे फोटो पाहता येतील. पाश्चिमात्य मिडिया मात्र ते लपवण्याचाच प्रयत्न करत असतो. इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या फोटोजमध्ये मॅककेन यांना सिरियामध्ये ISIS प्रमुख अबु बक्र अल बगदादीसह काही दहशतवाद्यांबरोबर पाहिले गेले आहे.

पुढील स्लाइड्सवर पाहा संबंधित फोटो...