आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोसूलमध्ये ISIS चा अंत सुरू; इराक, अमेरिकेच्या कारवाईने दहशतवादी संघटनेचे कंबरडे मोडले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मोसुल- गनमॅन  दुपारी आले होते. त्यांनी  इस्लामिक स्टेट (आयएस) चा युनिफार्म घातला होता. सात ते आठ कट्टरतावाद्यांनी पश्चिम मोसूलमध्ये बशर अबू अलीच्या घराचा दरवाजा ठोठावला, ज्यावर हल्ला करण्यासाठी त्यांनी आपला कायमचा अड्डा बनवला होता. पहिल्या मजल्यावर असलेल्या बेडरूममधून रस्त्यावर गोळ्या झाडत असत. ही फेब्रुवारीच्या शेवटी आणि मार्चच्या सुररुवातीची घटना आहे. त्यावेळी इस्लामिक स्टेटची वेगाने पीछेहाट चालू होती. अमेरिकेच्या हवाई हल्ले आणि गोळीबाराच्या पार्श्वभूमीवर इराकी सेनेने शहराच्या मोठ्या भागावर कब्जा मिळवला होता. शहराचा पूर्व भाग आयएसच्या हातातून निसटला होता. त्यांना अाता पश्चिम भाग वाचवायचा होता. आयएसच्या दहशतवाद्यांनी अबू अलीसारख्या शेकडो घरांवर ताबा मिळवला होता. 

यांनर मात्र एका भयंकर लढाईला सुरुवात झाली. एका कॉफी शॉपचा ४३ वर्षांचा मॅनेजर अबू ११ दिवस आपल्या नातेवाइकांसमवेत घराखाली तळघरात अडकून पडला होता आणि आयएसचे दहशतवादी वरून गोळीबार करत होते. अमेरिका, इराकी विमानांची बाँबफेक चालू असताना अबूला असे वाटत होते की, आपण आता वाचत नाही. पण इराकी लष्कर आणि पोलिस येताच गोळीबार करणारे पळून गेले. सहा महिन्यांच्या लढाईनंतर माेसूल, आयएस दहशतवाद्यांच्या तावडीतून मुक्त होण्याची चिन्हे आहेत. जून २०१४ मध्ये इसिसने इराकचे दुसरे मोठ्या शहरावर कब्जा मिळवून आपण एक नवे राज्य बनवत असल्याची घोषणा केली होती. इराक आता फार काळ एक राहणार नाही, असा त्यांचा दावा होता. 
 
मोसूलचा अर्ध्याहून आधिक भाग इसिसच्या तावडीतून मुक्त झाला आहे. एक लाख इराकी सैनिक, शिया, सुन्नी, कुर्दिश लष्कर आणि अमेरिका, फ्रान्स, ब्रिटन, आस्ट्रेलियाच्या हवाई दलाने इसिसच्या विरोधात युद्ध छेडले अाहे.  इराकी लष्कराने टिगरिस नदीपर्यंत शहराच्या संपूर्ण पूर्व भागावर कब्जा केला. आता त्यांनी मोर्चा पश्चिम विभागाकडे वळवला आहे. इसिसच्या अंदाजे २ हजार दहशतवाद्यांना लष्कराचा वेढा पडला आहे.   

इराकी सैन्याला हे माहीत आहे की, त्यांच्या विरुद्ध लढणाऱ्या उग्रवाद्यांमध्ये अनेक विदेशी आहेत की, जे आपला देश असलेल्या सौदी अरेबिया  किंवा बेल्जियम अथवा ट्युनिशियामध्ये जाऊ शकणार नाहीत. इराकी सैन्यानुसार ते प्रशिक्षित लढवय्ये आहेत. दोन्ही पक्षांच्या लढाईमुळे लोकांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. इसिसच्या कब्जातील मोसूलमध्ये अंदाजे पाच लाख लोकांसमोर अन्न, पाणी, इंधन, औषध कमतरतेच्या समस्येने हैराण आहेत. पोलिस सार्जंट जफर जावेद म्हणतात की, भोवताली सामान्य नागरिक असल्याने आम्ही जोरदार गोळीबार करू शकत नाही. पण हवाई हल्ल्यामुळे सामान्य नागरिकांचे मोठे नुकसान झालेले आहेच. 

यामुळे स्थानिक लोक अमेरिका आणि मित्र देशांच्या विरोधात जाण्याचा धोका आहे. अमेरिकन सैन्याचे रिटायर्ड जज लेफ्टनंट कर्नल जे. मोर्स यांचे म्हणणे आहे की, नागरिकांचे नुकसान झाले तर त्याचा फायदा इसिसलाच होणार आहे.  

आयएससाठी माेसूल म्हणजे जिहादी सरकारची प्रयोगशाळाच होती. शहराच्या स्वतंत्र भागात त्याचे अवशेष दिसून येतात. अनेक वस्त्यांमध्ये मृतदेहांचे ढीग होते. अतिरेक्यांनी एक हॉटेल म्हणजे कार रजिस्ट्रेशन ऑफिस बनवले होते. बाँबफेकीने उद्ध्वस्त झालेल्या इमारतींच्या बाहेर इस्लामिक स्टेटच्या मोटार लायसनची प्लेट पडलेली होती. आपल्या ३३ महिन्यांतील शासन काळात आयएसच्या जिहदींनी मोटारी आणि अन्य मौल्यवान वस्तू सिरियात पोहोचवल्या. 
बातम्या आणखी आहेत...