आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

करोडोंची नोकरी सोडून स्विकारला शिक्षकी पेशा; 3 वर्षांत 190 मुलांना ऑक्सफर्डसारख्या संस्थांमध्ये प्रवेश

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तफ्सिया सिकदर - Divya Marathi
तफ्सिया सिकदर
लंडन- पूर्व लंडनमध्ये हॅम, हॅमिल्टन टॉवरसारखे जुने शहर वसले आहे. यातील काही भागात निर्वासित म्हणून आलेले काही जण ब्रिटनमध्ये स्थायिक झाले. छोट्या-मोठ्या नोकरीवर गुजराण करतात. मात्र, काहींची मुले आता ऑक्सफर्ड, केंब्रिज व अमेरिकेच्या एमआयटीसारख्या संस्थांत शिकत आहेत. न्यूहॅम कॉलेजिएट स्कूलचे प्राचार्य मोहसीन इस्माईल यांच्या कष्टाचे हे फलित आहे. मोहसीन इथे अर्थशास्त्र शिकवतात. तीन वर्षांपूर्वी सुरू झालेल्या या शाळेचे ते गेल्यावर्षी प्राचार्य झाले. त्यानंतर पहिल्याच वर्षी ९५% मुलांना या संस्थांत प्रवेशाच्या आॅफर मिळू लागल्या. मोहसीन म्हणाले, आमची शाळा मुलांची पार्श्वभूमी पाहत नाही, त्यांना कोणत्या उंचीवर न्यावयाचे यावरच भर असतो. मोहसीनही याच भागात वाढले. ३ वर्षांपूर्वी वकिली सोडून त्यांनी शिक्षक होण्याचा निर्णय घेतला.  समाजाकडून मिळालेले समाजाला द्यावे या उद्देशासाठी शिक्षक होण्याचा निर्णय घेतला, असे मोहसीन यांचे म्हणणे आहे.

एमआयटीची १.३० कोटी रुपये शिष्यवृत्ती मिळवणारी तफ्सिया म्हणाली, लहान दृष्टिकोन मोठी स्वप्ने पाहण्यातला अडथळा, अन्यथा काहीही साध्य करू शकतो 
न्यूहॅम स्कूलच्या तफ्सिया सिकदरला अमेरिकेच्या एमआयटीत प्रवेश मिळाला आहे. तिला वार्षिक १.३० कोटी रुपयांची शिष्यवृत्ती मिळते. तफ्सियाचे आई- वडील बांगलादेशचे निर्वासित म्हणून ब्रिटनला आले होते. आपल्या यशाबाबत तफ्सिया म्हणाली,  एमआयटीत प्रवेश मिळाल्याचा विश्वास बसत नाही.  जगातील उत्कृष्ट व स्मार्ट लोकांसोबत शिकण्याची संधी मिळेल, असे वाटले नव्हते. त्यांना प्रतिभावंत लोक हवे आहेत, यात तुमची पार्श्वभूमी कोणती याला अर्थ नसतो. गरीब असल्यामुळे एमआयटीत प्रवेशासाठी अर्ज करू शकत नाही, असे कुणी समजू नये. मोठी स्वप्ने कोणीही पाहू शकतो. मानसिक कोंडमारा मोठी स्वप्नेे पाहण्यात आडकाठी आणतो. आपला मोठा दृष्टिकोन असायला हवा. यामुळे आपण बळकट होतो.
बातम्या आणखी आहेत...