आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Steven Spielberg Will Give Advice To Make Hillary Clinton More Attractive

हिलरी क्लिंटन ATTRACTIVE दिसाव्या म्हणून स्टीव्हन स्पिलबर्ग यांचे DIRECTION

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिकेचे माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांच्यासह हिलरी. - Divya Marathi
अमेरिकेचे माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांच्यासह हिलरी.
न्यूयॉर्क - अमेरिकेच्या आगामी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी स्पर्धेत असलेल्या हिलरी क्लिंटन यांची इमेज तयार करण्यासाठी हॉलीवूडचे डायरेक्टर कामाला लागले आहेत. हिलरी यांचे पती आणि अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांनी हिलरी यांची इमेज अॅट्रॅक्टीव्ह बनवण्याची जबाबदारी प्रसिद्ध डायरेक्टर स्टीव्हन स्पिलबर्ग यांना दिली आहे. अमेरिकेच्या एका पत्रकाराने त्याच्या ‘अनलाइकेबल’ नावाच्या चरित्रामध्ये हा दावा केला आहे. हिलरी यांना एक अनुभवी आणि आवडत्या नेत्या म्हणून सर्वांनी स्वीकारावे आणि त्यांची उपस्थिती प्रत्येक ठिकाणी जाणवावी अशी बिल क्लिंटन यांची इच्छा आहे.

क्लिंटन यांना भिती...
इलेक्शन कँपेनमध्ये लीडरची इमेज सर्वात खास असते. लीडरची उपस्थिती आणि आत्मविश्वास याकडे लोकांच्या नजरा असतात. बिल क्लिंटन यांनाही त्याचा चांगलाच अनुभव आहे. बहुधा त्यामुळेच त्यांनी हिलरी यांची इमेज अधिक अॅट्रॅक्टीव्ह बनावी यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. हिलरी या इलेक्शन कँपेनमध्ये मार्गरेट थॅचर सारख्या दिसतील अशी भिती बिल क्लिंटन यांना होती. 67 वर्षीय हिलरी या सध्या आगामी अध्यक्षीय निवडणुकीच्या तयारीसाठी रात्रंदिवस एक करून प्रयत्न करत आहेत.

इमेज कशी बदलणार?
डायरेक्टर स्पिलबर्ग यांना सांगण्यात आले की, त्यांनी एका अशा अॅक्टींग कोचची व्यवस्था करावी जो हिलरी यांच्या चेहऱ्यावरील हावभाव चांगले राहावे यासाठी प्रयत्न करेल. स्पिलबर्ग यांना हिलरी यांचे लाइकेबिलिटी सेशन्स घेण्याची जबाबदारीही देण्यात आली आहे. त्यानुसार हिलरी यांना त्यांचे भाषणाचे टेप तयार करून स्टीव्हन यांना दाखवावे लागतील. हिलरी यांना रॅलीनंतरही प्रतिक्रिया सांगितल्या जाणार आहेत.

पुढील स्लाइड्सवर पाहा, हिलरी यांचे PHOTOS