आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्वालामुखीवर सापडले प्राचीन द्वार, वैज्ञानिकांसाठीही आव्हान...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनॅशनल डेस्क - गेल्या काही वर्षांपासून संशोधक उपग्रहांवरून छायाचित्रे काढून साऱ्या जगाचा सर्व्हे करत आहेत. त्याच सर्व्हे दरम्यान संशोधकांना सौदी अरेबियातील हरत-खैबर प्रांतात एक रहस्यमयी ज्वालामुखी सापडले आहे. या ज्वालामुखीचे वैशिष्ट्य म्हणजे, त्यावर दगाच्या अजब आकृती सापडल्या आहेत. अगदी दारांप्रमाणेच दिसणाऱ्या या आकृतींना शास्त्रज्ञांनीही द्वार असे नाव दिले आहे. हे द्वार हजारो वर्षे जुने असल्याचा अंदाज आहे. द्वाराच्या एवढ्या मोठ्या आकृत्या कुणी आणि का आणि नेमके कशा बनवल्या असतील हे शास्त्रज्ञांसाठी अजुनही एक गूढ आहे. 

गूगल अर्थ नकाशातून शोधल्या आकृत्या...
>> लाइव्ह सायंसच्या एका अहवालानुसार, गुगल अर्थ मॅप्सवरून घेतलेले हे फोटोज जगभरातील पुरातत्ववेदतांनासाठी एक आव्हान बनले आहे. 
>> वेस्टर्न ऑस्ट्रेलिया विद्यापीठातील प्राध्यापक डेविड केनेडी यांनी अरेबियन आर्कियोलॉजीवर लिहिलेल्या रिसर्च पेपर्समध्ये सांगितले की, लावा डोमवर हे गेट्स पूर्णपणे मऊ खडकांनी बनले आहेत. कदाचित मानवाने तयार केलेल्या सर्वात जुन्या आकृत्यांपैकी एक आहे.
>> डेविड यांनी सांगितले, की हे द्वार जवळपास 7 हजार वर्षे प्राचीन असू शकतात. त्यांचे नेमके वय सांगणे अजुनही कठिण आहे. 
>> शेकडोंच्या संख्येने मिळालेल्या या द्वारांपैकी काही 1700 फुटांपर्यंत लांबल लचक आहेत. हजारो वर्षांपूर्वी हे गेट आणखी स्पष्टपणे दिसत असावे असा अंदाज आहे. 
 

पुढील स्लाइड्सवर पाहा, आणखी काही फोटोज...
बातम्या आणखी आहेत...