आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

14 वर्षानंतरही भरली नाही इराक वॉरची जखम, PHOTOS मधून पाहा बेचिराख इराक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इराकी व्यक्तीचा मृतदेह फरफटत ओडत नेताना अमेरिकन जवान... - Divya Marathi
इराकी व्यक्तीचा मृतदेह फरफटत ओडत नेताना अमेरिकन जवान...
इंटरनॅशनल डेस्क- इराक वॉरला 14 वर्षाहून अधिक काळ लोटला आहे. मात्र, अजूनही तेथील स्थिती सामान्य झालेली नाही.  2003 मध्ये आजच्या दिवशी (7 एप्रिल) अमेरिकन सेनेने इराकची राजधानी बगदादला आपल्या कंट्रोल मध्ये घेतले होते. अमेरिकेच्या नेतृत्त्वाखालील मित्र राष्ट्रांनी इराकजवळ अणुबॉम्ब आणि जैविक हत्यारे असल्याचा आरोप करत 20 मार्च रोजी हल्ला केला होता. त्यानंतर फक्त 21 दिवसात अर्ध्या इराकवर केला होता ताबा.....
 
- इराक यु्द्धाला चौदा वर्ष पूर्ण होत आहेत. जैविक अस्त्रांचा शोध घेण्यासाठी अमेरिकेचे तत्कालिन राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू बुश यांनी या युद्धाला तोंड फोडले होते. 
- चौदा वर्षानंतर अमेरिकेतील अनेक नागरिकांना प्रश्न पडला आहे की, या युद्धातून काय मिळाले. सद्दाम हुसैनला फासावर लटकवण्याशिवाय या युद्धातून काहीही निष्पन्न झालेले नाही. 
- गॅलप या अंतरराष्ट्रीय संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात ५३ टक्के नागरिकांनी इराकवर लादलेले युद्ध ही अमेरिकेची सर्वात मोठी चूक होती असे म्हटले आहे. 
- अमेरिका आणि त्यांच्या सहकारी राष्ट्रांनी केवळ अफवांवर इराकला युद्धाच्या खाईत लोटले. जागतिक विरोध आणि संयुक्त राष्ट्राच्या नकारानंतरही अमेरिकेने इराकमध्ये दोन लाख सैनिक पाठवले आणि हवाई हल्ले केले. 
- काही दिवस अमेरिकेला त्रस्त केल्यानंतर इराकची राजधानी बगदादने आत्मसमर्पण केले.
- युद्धाच्या आठ वर्षानंतर (२०११) अमेरिकेने इराक मधील आपले बस्तान हलवले होते. 
- इराक युद्धात अमेरिकेच्या ४,४७५ सैनिकांना जीव गमवावा लागला, तर ३२ हजार सैनिक जखमी झाले होते.
या युद्धात अमेरिकेने पहिली गोळी झाडली असेल तर त्याचा शेवट एका इराकी व्यक्तीने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बुश यांच्यावर बुट फेकून केला होता. 
 
असा होता घटनाक्रम-

- २१ मार्च २००३ :  सद्दाम हुसैन यांच्या महालातून काळा धूर निघत होता. अमेरिकेच्या लढाऊ विमानांचे पहिले लक्ष राजधानी बगदादमधील हा महाल झाली होती. हल्ल्यानंतर आकाशात धुरांचे लोट उसळले होते.
- इराक युद्धापूर्वी २३ ऑक्टोबर २००२ रोजी अमेरिकेचे तत्कालिन राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू बुश यांनी अमेरिकन लष्करासाठी ३५५ अब्ज डॉलर मंजूर केले होते. लष्कराला मिळालेल्या या पॅकेजनंतर पेंटागॉनने इराक युद्धासाठी ४० अब्ज डॉलरचा चुराडा केला.
१ मार्च २००३ रोजी एलीट् रिपब्लिकन गार्ड ऑफिसरसोबत चर्चा करताना इराकेच राष्ट्राध्यक्ष सद्दाम हुसैन. इराकने संयुक्त राष्ट्राच्या आदेशानंतर समॉद-२ क्षेपणास्त्र नष्ट केले होते.  तसेच, शस्त्रास्त्र निरीक्षकांना पाहणी करू देण्याचे मान्य केले होते.
- त्याआधी ५ फेब्रुवारी रोजी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री कॉलिन पॉवेल यांनी संयुक्त राष्ट्र परिषदेमध्ये इराकवर आरोप केला की, ते जैविक शस्त्रांमध्ये अँथ्रेक्सचा वापर करत आहेत. त्याचबरोबर इराक बेकायदा शस्त्रांस्त्रांची निर्मीती करत आहे.
- जॉर्ज डब्ल्यू बूश यांनी १९ मार्च रोजी त्यांच्या ओव्हल कार्यालयातून टीव्हीच्या माध्यमातून इराक युद्धाची घोषणा केली. अमेरिकेचे म्हणणे आहे की, या घोषणेनंतर काही मिनीटांमध्येच इराकच्या आकाशात काळे ढग दिसायला लागले. कानांवर सतत स्फोटांचे आवाज येत होते.
- इराक जैविक अस्त्रांचा मारा करू शकते अशी बातमी २० मार्च २००३ रोजी आली आणि त्यामुळे कुवैतमध्ये तैनात सैनिकांमध्ये चलबिचल सुरू झाली. सैनिकांनी केमिकल सुट घातले आणि रात्रभर जैविक बंकरमध्ये लपून बसले.
- या युद्धात केवळ इराक इराकच्या सैनिकांनाच झळ बसलेली नाही तर, ब्रिटीश सैनिकांनाही युद्धाच्या वनव्यात होरपळावे लागले होते. १९ सप्टेंबर २००५ रोजी बसरा येथे गोळीबारीनंतर टँकला आग लावून देण्यात आली. या जळया-या टँकमध्ये असलेल्या सैनिकाच्या डोक्याने पेट घेतला होता. त्याच अवस्थेत त्याने टँकबाहेर उडी घेतली होती.
 
पुढे स्लाईडद्वारे पाहा, छायाचित्रातून पाहा अमेरिकेने कसा बेचिराख केला इराक....
बातम्या आणखी आहेत...