आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेफ्युजींसाठी बेट खरेदी करून देणार आयलानचे नाव, वाचा या STORIES

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काही आखाती देशांमधील अशांतीच्या वातावरणामुळे त्याठिकाणच्या रेफ्युजी संकटाने अत्यंत कठीण स्थिती निर्माण झाली आहे. गेल्या वर्षी या संकटाने चांगलेच तोंड वर काढले. पण सुरुवातीला रेफ्युजींबाबत नाकं मुरडणाऱ्या अनेक देशांनी आयलान नावाच्या चिमुरड्याच्या मृत्यूनंतर मात्र रेफ्युजींसाठी दारे उघडली. त्यानंतर जगभरातून रेफ्युजींना मदत यायला सुरुवात झाली.

रेफ्युजींना मदत करण्यासाठी विविध देश छावण्यांच्या किंवा इतर माध्यमातून पुढे सरसावले. त्याचप्रमाणेच जगातील काही सुजाण नागरिकांनीही याबाबत आपली जबाबदारी ओळखली आणि त्यांच्या परिने शक्य तशी मदत करण्यास सुरुवात केली. काही नागरिकांनी आदर्श घालून द्यावी अशी पावले यासाठी उचलली. अशाच काही भल्या माणसांबाबत आपण आज जाणून घेणार आहोत.
रेफ्युजींसाठी बेट विक घेण्याची इच्छा
इजिप्तमधील स्टॉक कंपनी ओरास्कोम टेलिकॉम मीडिया अँड टेक्नॉलॉजी कंपनीचे चेअरमन नागिब साविरीस यांनी रेफ्युजींसाठी एक बेटच खरेदी करण्याची तयारी दाखवली आहे. युरोपमधील या वाढत्या संकटावर तोडगा म्हणून त्यांनी फेसबूक पोस्टद्वारे ही तयारी दर्शवली आहे. विशेष म्हणजे या बेटाला आयलान आयलंड असे नाव देण्याचा त्यांचा मानस आहे. आयलानच्या मृत्यूनंतरच ख-या अर्थाने जगात रेफ्युजी संकटावर गंभीर चर्चा सुरू झाली होती. दोन खासगी बेटांच्या बाबतीत सध्या विचार सुरू असल्याचे साविरीस म्हणाले आहेत.
पुढील स्लाइड्सवर वाचा, रेफ्युजींना मदत करणाऱ्यांच्या अशाच काही STORIES