आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑस्ट्रेलियात वादळी तडाखा, बोंडी समुद्रकिनारा \'धुळी\'त मिळाला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र: सिडनीतील प्रसिध्‍द बोंडी बीचला वादळाचा तडाखा.
सिडनी - ऑस्ट्रेलियात लागोपाठ तिस-या दिवशीही वादळाचा तडाखा कायमच आहे. यात चार जणांचा जीव गेला असून अनेक बेपत्ता आहेत. पूर्वोत्तर भागात सुमारे ४० फूट उंचीच्या लाटांनी धुमाकूळ घातला. तर, वादळाने शहरे उद‌्ध्वस्त केली.

उत्तर तटाकडून सोसाट्याचे वादळ
हवामानखात्याने दिलेल्या माहितीनुसार, सिडनीच्या उत्तर तटावर आणखी एक चक्रीवादळ तयार झाले आहे. याचा ताशी वेग १०० किमी असून असे चक्रिवादळ १० वर्षांतून एकदाच येते.

हजार लोक वाचले
दरम्यान,जीवघेण्या वादळात अडकलेल्या एका जहाजातील हजार प्रवाशांना बचावपथकाने वाचवले आहे. यात १५०० क्रू सदस्यही होते. सिडनी हार्बर बंद असल्याने हे जहाज दोन दिवसांपासून अडकून पडले होते.