आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हृदय छोटे, दु:ख मोठे : जन्मल्यापासून 10 महिन्यांत झेलले ५ हृदयविकाराचे झटके

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूकॅसल (ब्रिटन) - त्याला या जगात येऊन अवघे दहाच महिने झाले आहेत. पण त्याने एवढ्या समस्या झेलल्या आहेत की, कोणी वयस्क असता तर तोदेखील नसता वाचला. ही गोष्ट आहे लेनॉक्स नावाच्या एका दहा महिन्याच्या मुलाची. ज्याचा जन्म गेल्या सप्टेंबरात झाला आहे. जन्मल्यापासूनच त्याला ५ हृदयविकाराचे झटके आले आहेत. अद्याप त्याने बाहेरची दुनियाच पाहिली नाहीये. एवढे दु:ख सहन करूनही तो नेहमी हसत असतो.
डॉक्टरांच्या मतानुसार त्यास हिपोप्लास्टिक लेफ्ट हार्ट सिंड्रोम झालेला आहे. या स्थितीत हृदयाचा डावा भाग विकसित होऊ शकत नाही. प्रारंभापासून तो आयसीयूतच आहे. त्याची आई लॉरा, वडील जॉर्डन यांच्यासह दोन्ही भाऊ रिले आणि कोले त्याची पूर्ण वेळ काळजी घेतात त्याच्यावर लक्ष ठेवताहेत. लाॅरा सांगते की, प्रत्येक झटक्यांनंतर तो पूर्ण ताकदीनिशी उभा राहतो आहे आणि हसत असतो. जणुकाही त्याने लढाईच जिंकली आहे.

लॉरा सांगते की, त्याचे नाव लेनॉक्स हे मुष्टियोद्धा लेनॉक्स लुईस यांच्या नावावर ठेवले आहे. मला हेच नाव चांगले वाटले. लॉराच्या मतानुसार जेव्हा तो १२ दिवसांचा होता तेव्हाच त्याला पहिला हृदयविकाराचा झटका आला होता. तेव्हापासून त्याला आणखी ४ वेळा हा झटका येऊन गेला आहे. लॉरा सांगतात की, जेव्हा लेनॉक्स गर्भात होता तेव्हा २० आठवड्यातील तपासणीदरम्यान आम्हाला कळले होते की, होणारे बाळ मुलगाच आहे. आम्ही फार उत्साहित होतो. पण डॉक्टरांना जाणवले होते की, त्याच्या हृदयात काहीतरी समस्या आहेत. याचा आम्हालाही धक्काच बसला जेव्हा आम्हालाही हे पहिल्यांदा कळले होते. कारण की आमची पहिली दोन्ही मुले उत्तम आरोग्यपूर्ण जन्मली होती. गर्भपाताचाही सल्ला दिला गेला होता. पण आम्ही कोणाचेही ऐकले नाही. जेव्हा लेनॉक्स या दुनियेत आला-जन्मला तेव्हादेखील लाइफ सपोर्ट हटविण्यास सांगण्यात आले होते. पण आम्ही हार मानली नाही. रॉयल व्हिक्टोरिया हॉस्पिटलमध्ये त्याचा जन्म झाला. दोन तासांनंतरच त्याला बाल हृदय विशेषज्ञाकडे ट्रान्सफर करण्यात आले. तीन दिवसांचा तो होता तेव्हा त्याची मोठी शस्त्रक्रिया करण्यात आली. आठ तासांनंतर जेव्हा त्याचा चेहरा आम्हाला बघायला मिळाला तेव्हा तो वायर्स आणि ट्युब्सने घेरलेला होता. त्याच्या छातीमध्ये एक छेद दिसत होता. ज्यामधून त्याचे धडधडणारे लहानगे हृदय स्पष्टपणे दिसू शकत होते. ते दृश्य आजही डोळ्यासमोरून जात नाही. हळूहळू त्याचे हृदय, किडनी आणि फुप्फुसांच्या सपोर्टसाठी यंत्रे लावली गेली. काळानुसार आणखी चार यंत्रे लावली गेली जेणेकरून तो लवकर रिकव्हर व्हावा. आताही कुटुंबाला ही आशा आहे की, त्याचा पहिला वाढदिवस तो आपल्या भावंडांसह घरीच साजरा करू शकेल.

Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.

बातम्या आणखी आहेत...