आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इस्तंबूल : जखमी होता, पण लहान पाहुण्याची चिंताही होती, अधिकाऱ्यासाठी देशभरात प्रार्थना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्तंबूल (तुर्की) - तुर्कीची राजधानी इस्तंबूलच्या विमानतळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात अहमत बेर्कर नावाच्या पोलिस कर्मचाऱ्याने अनेकांचे प्राण वाचवले. संपूर्ण देश त्याच्यासाठी प्रार्थना करत आहे. स्थानिक माध्यमेही त्याच्या शौर्याची स्तुती करत आहेत. जीवन आणि मृत्यू यांच्यातील लढाईत झुंजताना त्याच्या मनात आपली पत्नी आणि होणाऱ्या बाळाची चिंता होती. हल्ल्यात गंभीर जखमी आणि अर्धवट बेशुद्धीच्या अवस्थेतही तो म्हणत होता की, ‘माझी पत्नी नऊ महिन्यांची गर्भवती आहे आणि माझ्या घरी लवकरच लहान पाहुणा येणार आहे.’ ज्या अॅम्ब्युलन्सद्वारे त्याला रुग्णालयात नेण्यात आले तिच्या कर्मचाऱ्याने ही माहिती दिली. तीन दहशतवाद्यांपैकी एकाने बेर्करवर तीन गोळ्या झाडल्या होत्या.

सध्या तो रुग्णालयातील आयसीयूत गंभीर अवस्थेत आहे. बेर्करच्या एका नातेवाइकाने ‘करार’ या तुर्कीश वृत्तपत्राला सांगितले की, त्यांचा भाऊ एका हीरोप्रमाणे न घाबरता दहशतवाद्यांशी भिडला होता. त्यामुळेच शेकडो लोकांचे प्राण वाचू शकले. बेर्करच्या आतापर्यंत दोन शस्त्रक्रिया झाल्या आहेत. डॉक्टर त्याचे प्राण वाचवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत. वृत्तपत्राने लिहिले आहे की, ‘आम्ही त्याच्या आयुष्यासाठी ७.८ कोटी तुर्कीश लोकांची प्रार्थना कबूल होण्याची प्रतीक्षा करत आहोत.’ इस्तंबूल शहर मंगळवारी बॉम्बस्फोट आणि गोळीबाराने हादरले होते. तेथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर तीन आत्मघाती हल्ले आणि गोळीबार झाला होता. या हल्ल्यात आतापर्यंत ४३ जणांचा मृत्यू झाला आहे.

बेर्करने दहशतवाद्याला घुसण्यास रोखले होते आणि ओळख पटावी म्हणून कागदपत्रे मागितली होती. तो चोर असल्याचे बेर्करला वाटले होते, पण दहशतवाद्याने कागदपत्रे दाखवण्याऐवजी बेर्करची बंदूक हिसकावली होती. बेर्कर बरा व्हावा व कुटुंबीयांची बाळाशी त्याची भेट व्हावी म्हणून बेर्करच्या सहकारी पोलिस अधिकाऱ्यांनी फेसबुक ग्रुपच्या सदस्यांना प्रार्थनेची विनंती केली आहे.
Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.
बातम्या आणखी आहेत...