आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समुद्रात टायटॅनिकपेक्षा दुप्पट वजनाचे जहाज बुडाले, 2 वर्ष लागली बाहेर काढायला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोस्टा कॉनकॉर्डिया जहाजाचे आजच्या दिवशी(13 जानेवारी 2012) अपघात झाला होता. इटलीच्या गिग्लियो बेटाजवळ हे जहाज उलटले होते. या अपघातात जहाजमधील 32 लोकांना आपला जीव गमवावा लागला होता.
कसा झाला होता अपघात?
- 13 जानेवारी रोजी जहाज गिग्लियो बेटाजवळील शिखरांना धडकून उलटले होते.
- या अपघातात 32 लोकांचा मृत्यू झाला तर 64 लोक जखमी झाले होते.
- कॉनकॉर्डिया 950 फुट लांबीचा लाइनर क्रूझ होता.
- जहाजमध्‍ये दुर्घटनेच्या वेळी सुमारे 4 हजार 252 प्रवाशी आणि क्रू मेंबर होते.
जहाज दीड वर्ष समुद्रातच पडून
दुर्घटनेच्या दीड वर्षानंतर समुद्रात जहाज पडून होते. वर्ष 2013 मध्‍ये त्यास सरळ केले गेले. नंतर 2014 मध्‍ये पाण्‍यातून बाहेर काढल्यानंतर भंगारात बदलवण्‍यासाठी जिनिव्हाला पाठवण्‍यात आले. जहाजेच्या ब-याच भागात पाणी शिरले होते. ते काढण्‍यासाठी वेळ लागला. कोस्टा कोनकोर्डिया या जहाजाचे 2004 या वर्षांत निर्मिती केली गेली होती.
कोस्ट कॉनकार्डिया विरुध्‍द टायटॅनिक
टायटॅनिकच्या दुप्पट वजन असलेले हे जहाज अनेक बाबीत सर्रास होते.

लांबी :
कोस्टा कॉनकॉर्डिया - 951.4 फुट
टायटॅनिक - 882.9 फुट
प्रवाशी क्षमता :
कोस्टा कॉनकॉर्डिया : 3 हजार 780
टायटॅनिक : 2 हजार 440
क्रू मेंबर्सची संख्‍या :
कोस्टा कॉनकॉर्डिया - 1 हजार 68
टायटॅनिक - 860
मजल्यांची संख्‍या :
कोस्टा कॉनकॉर्डिया - 13
टायटॅनिक - 09
एकूण वजन :
कोस्टा कॉनकॉर्डिया - 1 लाख 12 हजार टन
टायटॅनिक - 46 हजार 329 टन
पुढील स्लाइड्सवर पाहा, कशा प्रकारे दीड वर्षात कोस्टा कॉनकॉर्डिया जहाज भंगारात बदलले...