आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्राध्यक्ष होण्यापूर्वी वर्षभर पॅडल बोटचे कॅप्टन अशी आेलांद यांची खास ओळख

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
१९८० ची घटना स्मरते. फ्रान्स्वा आेलांद यांची भेट एक समाजवादी नेते सॅगोलिन रोयाल यांच्याशी एका पार्टीत झाली होती. हा काळ राष्ट्राध्यक्ष जॅक शिराक यांचा होता. त्या पार्टीत शिराक आणि वेलेरी गिस्कॉर्ड यासारखे दिग्गज नेतेही होते. पाहता पाहता फ्रान्स्वा आणि सॅगोलिन यांचे प्रेम बहरत गेले. दोघेही सोशालिस्ट पार्टीशी संबंधित होते. दोघांनीही आपल्याबाबत लिहिण्याविषयी प्रसारमाध्यमांना मसाला दिला. योगायोगाने दोघांचेही आदर्श ज्यां पाल सात्र होते. ज्यां पाल मोकळेपणाने संबंध ठेवण्याचे पुरस्कर्ते होते. फ्रान्स्वा आणि सॅगोलिन यांच्यातही हेच साम्य होते. सॅगोलिन यांच्यावर पुस्तक लिहिणारे सेलवे करेज यांच्या म्हणण्यानुसार, दोघे फ्रान्सचे हिलरी क्लिंटन आणि बिल क्लिंटन मानले जात होते. राष्ट्राध्यक्ष होणे हा एकमेव उद्देश दोघांचाही होता. ओलांद यांना लहानपणापासूनच राष्ट्राध्यक्ष होण्याची इच्छा होती, असे त्यांच्या आईने एकदा सांगितले हेाते. सॅगोलिन यांच्यापेक्षा एका वर्षाने लहान असलेले फ्रान्स्वा पदवीधर झाले तोपर्यंत सॅगोलिनने राजकारणात स्टारडमचा आनंद घेण्यास सुरुवात केली होती. सॅगोलिन १९८२ मध्ये तत्कालीन राष्ट्राध्यक्ष फ्रान्स्वा मितेरां सरकारमध्ये सल्लागार झाल्या होत्या. सहा वर्षांत त्या या सरकारमध्ये मंत्री होत्या. दुसरीकडे ओलांद नॅशनल असेंब्लीमध्ये डेप्युटीच्या भूमिकेत कार्यरत होते. याचदरम्यान त्यांनी विवाह केला.

ओलांद राष्ट्राध्यक्ष झाले, त्याआधी वर्षभर ते या पदापर्यंत पोहोचू शकतील, असे कोणालाही वाटले नव्हते. कारण राजकारणातील त्यांचा प्रवेश खूप धिम्या गतीने होत होता. त्यांचे निकटवर्तीय त्यांना "पॅडल बोटचा कॅप्टन' संबोधत होते. काही जण त्यांना "मिस्टर नॉर्मल' म्हणूनही संबोधत. पदांमधील मोठे अंतर पुढे नातेसंबंधातही रुंदावत गेले. १९९० च्या दशकात ओलांद फ्रान्समधील मासिक पॅरिस मॅचच्या पत्रकार वेलेरी ट्रायविलर यांच्या जवळ आले. फ्रान्स्वा यांना चार मुले आहेत. सॅगोलिन यांना तोपर्यंत देशात अमाप प्रसिद्धी मिळाली होती. ओलांद १९९७ मध्ये सोशालिस्ट पार्टीचे एक किरकोळ नेते होते. २००३ मध्ये ट्रायविलर यांच्यासोबतचे संबंध उघड झाले. यावर सॅगोलिन यांनी ट्रायविलर यांना कार्यालयात बोलावून फटकारले होते. त्या म्हणाल्या, तुझे तीन मुले अाणि माझे चार त्यामुळे जरा जपून.

त्यानंतर फ्रान्स्वा आणि सॅगोलिन कसेबसे तीन वर्षे एकत्र राहिले. २००७ मध्ये रोयाल यांचा पराभव झाल्यानंतर अल्पावधीत दोघेही विभक्त झाले. ओलांद राष्ट्राध्यक्ष झाले तेव्हा ट्रायविलर त्यांच्यासोबत राष्ट्राध्यक्ष भवनात गेल्या होत्या. मात्र, २०१४ मध्ये दोघे पुन्हा वेगळे झाले. यामागचे कारण म्हणजे ओलांद यांचे नाव अभिनेत्री जुली गायेत हिच्याशी जोडले गेले. ट्रायविलर दुरावल्यानंतर रोयाल यांना ओलांद यांनी गव्हर्नमेंट आॅफ कॉम्बेटमध्ये पर्यावरण आणि ऊर्जामंत्रिपदी नियुक्त केले होते.
वादाचे मुद्दे
1. फ्रान्सच्या नॅशनल पार्टीच्या अध्यक्ष मेरिन ली पेन ओलांद यांच्या विरोधक राहिल्या आहेत. रशियाला मिस्त्रल क्लास हेलिकॉप्टर देण्याचा करार रद्द करणे असो की व्हिसा फ्री झोनचा मुद्दा असो त्यांचा विरोध कायम होता. मेरिन यांनी शार्ली हेब्दोवरील हल्ल्यानंतर ओलांद यांना म्हटले होते की, संशयित अतिरेक्यांना अाडकाठी घालण्यासाठी त्यांनी मुक्त व्हिसा धोरण नष्ट करावे. यासोबत इस्लाम मूलतत्त्ववादाच्या समर्थकांना निर्वासित करण्यात यावे. ओलांद यांनी त्यास मंजुरी नाकारली. मात्र, हल्ल्यानंतर त्यांना या शिफारशी मान्य करणे भाग पडले.

2. ओलांद यांनी राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर करप्रणालीत बदल केला. मात्र, दीड वर्षातच विरोध होऊ लागला. अशा स्थितीत ५० वर्षांत जेवढे राष्ट्राध्यक्ष झाले त्यात ओलांद यांना सर्वाधिक नापसंती मिळाली. ३० वर्षांत पहिल्यांदा फ्रान्स चलनाची क्रयशक्ती घटली. एका लाइव्ह टीव्ही कार्यक्रमात कोसोवोतून बाहेर काढलेल्या १५ वर्षांची मुलगी रोमा प्रकरणात फ्रान्स्वा काहीही करू शकले नाही.
अनेक नावाने ओळख
>फ्रान्सच्या माजी राष्ट्राध्यक्षांनी एकदा त्यांना एका सभेत म्हटले होते, फ्रान्स्वा मितेरांचा लेब्राडोर.
>फ्लेनबीही(फ्रेंच पुडींग) संबोधले जाते.
>चाहते, त्यांना मॅन ऑफ सिंथेसिस, मिस्टर कॉन्सिलेटर व मिस्टर कॉम्प्रोमाइजही म्हणतात.
>फ्रान्स्वांकडून पराभूत होणारे सर्काेझी त्यांना "मिस्टर लिटिल जोक्स' संबोधतात.