आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वॉरेन बफे यांच्याकडून शिकलो, मैत्री कशी निभवायला हवी : बिल गेट्स

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स आणि प्रसिद्ध गुंतवणूकदार वाॅरेन बफे यांच्या वयात २५ वर्षांचे अंतर आहे. वयात एका पिढीचे अंतर असले तरी हे दोघे पक्के मित्र आहेत. गेट्स यांच्या आईच्या पुढाकारानेच २५ वर्षांपूर्वी या दोघांमध्ये मैत्री झाली होती. इतकेच नाही तर गेट्स, बफे यांच्या मैत्रीने त्यांच्या आणि त्यांची पत्नी मेलिंडा यांच्या आयुष्यावरदेखील छाप सोडली आहे. या मैत्रीच्या रौप्य महोत्सवानिमित्त गेट्स यांनी एक खूप पत्रे लिहिली आहेत. यामध्ये त्यांनी काही आठवणी सार्वजनिक केल्या आहेत.
पहिल्याच नजरेत माझ्यात आणि वॉरेनमध्ये एकही साम्य दिसले नाही. मला तंत्रज्ञान आवडायचे, तर वॉरेनसारखे गुंतवणूकदार ई-मेलचाही वापर करत नव्हते. त्यामुळे त्यांच्याशी मैत्री करण्याची मला अपेक्षादेखील नव्हती. जुलै १९९१ दरम्यान सुट्या असल्याने मला आईने बोलावले होते. वॉरेन आणि आमच्या कुटुंबीयांचे काही मित्र आमच्या घरी येणार होते. आधी तर कामात वेळ मिळणार नाही, असे सांगून मी येण्यास नकार दिला होता. मात्र, मी वॉरेनची भेट घ्यावी अशी आईची खूप इच्छा होती. मी म्हणालो, तो फक्त कागदाचे तुकडे खरेदी-विक्री करतो. (त्या काळी शेअर ट्रेडिंग आॅनलाइन नव्हती) त्यात काहीच विशेष नाही. आमच्यात काहीही साम्य असल्याचे मला वाटत नाही. मात्र, आईने माझे एेकले नाही. शेवटी मी फक्त दोन तासांसाठी जाण्यास तयार झालो.

वॉरेनची भेट झाल्यावर त्यांनी काही प्रश्न विचारले. म्हणजे, मायक्रोसॉफ्टसारखी छोटी कंपनी आयबीएमसारख्या मोठ्या कंपनीसोबत स्पर्धा करण्याची तयारी करत आहे, तर कंपनीकडे किती कुशल लाेक आहेत, उत्पादनाची किंमत किती असणार इत्यादी. या आधी मला कोणीच असे प्रश्न विचारले नव्हते. आमच्या चर्चेत अनेक तास गेले. ते खूप प्रसिद्ध गुंतवणूकदार आहेत, असे त्यांनी मला भासवू दिले नाही. पहिल्याच भेटीत आमची पक्की मैत्री झाली.

बफेट यांना जेवण्यात बर्गर, आयस्क्रीम आणि कोक लागते हे समजताच मला आश्चर्य वाटते. एकदा आम्ही आमच्या घरी थांबलेलो होतो. सकाळी नाष्टा करताना त्यांनी बर्गर-आयस्क्रीम-कोकचे पॅकेट उघडले तर माझ्या मुलांनीही तेच खाण्याचा हट्ट केला. मुलांसमोर हा चुकीचा आदर्श ठरत असला तरी, त्यांचे आयुष्य याच जेवणावर सुरू होते. एकदा त्यांनी आम्हाला त्यांच्या घरी बोलावले होते. जेवण्याच्या टेबलावर गेल्यावर पाहिले तर, खुर्चांवरून उश्या गायब होत्या. वॉरेनलादेखील आश्चर्य वाटले. त्यांच्या घरच्यांना विचारल्यावर कळाले की, अनेक दिवसांपूर्वी त्यांचे कव्हर बदलण्यासाठी पाठवण्यात आले आहे. बफे स्वयंपाक घरातच जेवत असल्याने त्यांना या विषयी माहितीदेखील नव्हती.

माझ्या ऑफिसच्या फोनमध्ये दोनच नंबर स्पीड डायलवर आहेत- एक घरचा दुसरा वॉरेनचा. वॉरेनने मला फोन केला तर तो आठवडा माझ्यासाठी विशेष ठरतो. मी नेहमीच त्यांच्याकडून काहीतरी शिकत आलेलो आहे. आम्ही बिझनेस, राजकारण, जग, इनोव्हेशन या सर्व विषयांवर चर्चा करतो. गेट्स फाउंडेशनचे संचालक असल्यामुळे ते मेलिंडा आणि माझे खूपच चांगले “विचार मित्र’ आहेत. आम्ही नवरा-बायको जेव्हा अडचणीत असतो, तेव्हा हाच विचार करतो की, अशा परिस्थितीत बफे यांनी काय केले असते. वॉरेन आणि मला जगभरातील लोक आपापल्या क्षेत्रातील तज्ज्ञ मानतात मात्र, मला कधी-कधी त्यांना माझ्यापेक्षा जास्त माहिती असल्याचे वाटते. माझ्यासाठी ते पितृतुल्यच आहेत. बफे फक्त पैसे गुंतवणुकीत तज्ज्ञ नसून, लोकांमधील “गुंतवणुकीचे’ देखील ते विशेषज्ज्ञ आहेत. कितीही काम असले तरी, मित्रांसाठी ते वेळ काढतातच. गेल्या २५ वर्षांत मी त्यांच्याकडून खूप काही शिकलो मात्र त्यात, मैत्री काय असते हे सर्वात महत्त्वाचे आहे. तुम्ही स्वत: असा मित्र बनण्याची इच्छा बाळगून राहता. वॉरेनसारखा मित्र प्रत्येकाला मिळायला हवा. आजही मी ज्या-ज्या वेळी त्यांच्या घरी ओमाहामध्ये जातो तेव्हा ते स्वत: मला घेण्यासाठी विमानतळावर येतात. ही बाब पाहण्यासाठी खूपच छोटी असली तरी माझ्यासाठी खूपच मोठी आहे. विमानाचे दार उघडण्याची मला खूप जास्त उत्सुकता असते. कारण मला माहिती असते की, एखादी नवीन गोष्ट आणि जोकसोबत ते माझी वाट पाहत असतील. पुन्हा मला त्यांच्याकडून काहीतरी शिकायला मिळेल, पुन्हा त्यांच्यासोबत खळखळून हसायला मिळेल. वॉरेन या मैत्रीसाठी धन्यवाद. हे २५ वर्ष अद््भुत होते.

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...