आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Story About Georgian Lady Who Give Examination Before Delivered

आधी परीक्षा, नंतर दिला मुलीला जन्म! अशी आहे या बहादूर जॉर्जियन महिलेची कथाकथा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जॉर्जिया- आई या शब्दामागे ‘महान’ हे विशेषण जोडले जाते. टोमीट्राइस कॉलिन्स (२१) हिने ते सार्थ ठरवले आहे. या बहादूर आईने रुग्णालयात आधी परीक्षा दिली आणि नंतर लगेचच मुलीला जन्म दिला.
ही घटना १२ नोव्हेंबरची. मॅकन काउंटीच्या कोलेसियम मेडिकल सेंटरचा प्रसूती वॉर्ड सुमारे दीड तासासाठी परीक्षा केंद्र झाला होता. रुग्णालयात गाऊनमध्ये बसलेल्या टोमीट्रॉइसच्या हाताला सलाइन होते आणि ती लॅपटॉपवर प्रश्नांची उत्तरे देत होती. तिने दीड तासात ही मानसशास्त्राची परीक्षा दिली. पेपरसाठी वेळ होता अडीच तासांचा. यादरम्यान तिला प्रसूतिवेदनाही होत होत्या. ती मिडल जॉर्जिया स्टेट युनिव्हर्सिटीची विद्यार्थिनी आहे. तिला या परीक्षेसाठी विशेष परवानगी मिळाली होती. टोमीट्राइसने सांगितले, ‘हे जीवन माझ्यासाठी विशेष भेट आहे. प्रत्येक क्षण माझ्यासाठी खास होता. पुढचा संपूर्ण काळ मला मुलीसोबत घालवायचा असल्याने ही परीक्षा टाळण्याची माझी इच्छा नव्हती.’

मुलीचे नाव टायलर एलिस आहे. वजन सुमारे सव्वातीन किलो. टोमीट्राइसची बहीण शनेल तिच्यासोबत होती. शनेल म्हणाली,‘हे आहे आईचे साहस. तिला प्राधान्य कळले. या धैर्याला सलाम. सिस, तू ग्रेट आई होणार आहेस.’
शलेनने आई-मुलीचे छायाचित्र सोशल मीडियावर शेअर केले. त्यावर जगभरातून सकारात्मक प्रतिक्रिया मिळाल्या. टोमीट्राइस पुढच्या वर्षी पदवीधारक होईल. तिला ‘लॉ एन्फोर्समेंटमध्ये’ करिअर करायचे आहे. तिला मॅकन काउंटीच्या शेरीफ विभागात डेप्युटी पदाचा प्रस्ताव मिळाला आहे. पण टोमीट्राइस सध्या मुलीच्या संगोपनात व्यग्र आहे. या परीक्षेत तिला ‘बी’श्रेणी मिळाली आहे, पण टोमीट्राइस नाराज नाही. कारण आयुष्याच्या परीक्षेत ती उच्च श्रेणीत उत्तीर्ण झाली आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा, टोमीट्राइस कॉलिन्स आणि तिच्या बाळाचे खास PHOTOS...