आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

AMAZING VIDEO: कागदावर अवतरली वोडक्याची बाटली; पाहा, चित्राचा पूर्ण प्रवास

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एक कोरा कागद. त्यावर काही पेन्सीलच्या फिकट रेषा. त्यानंतर त्यामध्ये जलरंगाचा वॉश मारला जातो आणि त्यानंतर हळूहळू एक-एक रंग भरायला सुरूवात होऊ लागते. एक एक रंग भरत गेल्यानंतर डोळ्यासमोरील रेषा हळू हळू चित्रामध्ये रुपांतरीत व्हायला लागतात. मग एकानंतर एक विविध फिकट रंगाच्या छटा, त्यानंतर बारीकसाईक बारकावे भरले जातात. त्यानंतर नंबर येतो गडद रंगांचा. याची सुरूवात गडद रंगाच्या ठळक बाबींनी सुरू होते आणि मग गडद रंगाच्या रंगछटा. पुन्हा बारकावे, आणि शेवटी प्रकाश आणि छायाभेद यांचे सविस्तर काम सुरू होते. तेव्हा हे चित्र केवळ चित्रच राहात नाही तर ते खरी वस्तू असल्याचा भास व्हायला लागतो. असाच काहीसा प्रयोग आज आम्ही तुम्हाला इथे दाखवणार आहोत. चित्रकार Marcello Bargenghi यांनी काढलेले हे चित्र भल्या भल्यांना तोंडात बोटं टाकायला लावणारे आहे.
चला तर मग पाहूयात या चित्राचा प्रवास..
पुढील स्लाईडवर पाहा, हे चित्र कसे बनत जाते याचा प्रवास आणि शेवटच्या स्लाईडवर या चित्राचा व्हिडीओ...
सौजन्य... Italian Art.. by Marcello Barenghi (Youtube)