आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तहर्रश : हा आहे सामुहिक बलात्काराचा खेळ, वाचा या घृणास्पद प्रकाराबाबत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो - प्रतिकात्मक - Divya Marathi
फोटो - प्रतिकात्मक
हो तुम्ही अगदी बरोबर वाचत आहात. तहर्रश हा महिलांवर सामुहिक बलात्काराचा प्रकार असून त्याला खेळही म्हणतात. ग्रूप सेक्स, गँग रेप किंवा लैंगिक अत्याचाराच्या या प्रकाराला तहर्रश असे नाव देण्यात आले आहे. यात घोळक्यात असलेले इतर तरुण महिलांवर अत्याचार, सामुहिक बलात्कार करत असतात. गोल रिंगण करून आत हा प्रकार सुरू असतो आणि रिंगणाच्या बाहेर असेलेले इतर लोक कोणी याला विरोध करू नये म्हणजे बलात्काराचा हा खेळ खेळणाऱ्यांचे संरक्षण करण्यासाठी उभे असतात.
तहर्रश हा एक अत्यंत अमानवी आणि क्रूर अशा लैंगिक शोषण, हिंसाचाराचा प्रकार आहे. महिलांवर हजारो वर्षांपासून होत असलेल्या अत्याचारात या आणखी एका घृणास्पद प्रकाराचा समावेश झाल आहे. तहर्रशबाबत अचानक चर्चा सुरू झाल्याचे कारण म्हणजे नववर्षाच्या रात्री सेलिब्रेशन दरम्यान जर्मनीमध्ये हा प्रकार घडला. त्यामुळे मीडियाचे लक्ष या प्रकाराकडे वेधले गेले. पण सुमारे दहा वर्षे किंबहुना त्याही आधीपासून मध्य आशियात काही ठिकाणी असे अनेक प्रकार घडले पण त्याच्या बातम्या फारशा समोर आल्या नाहीत. सामुहिक बलात्काराच्या या खेळाने आता युरोपातही पाय पसरायला सुरुवात केल्याचे समोर आले आहे. त्यामुळेच खरंतर यावर एवढी चर्चा सुरू झाली आहे. युरोपात सध्या हजारो रिफ्युजी येत असल्याने हा चिंतेचा प्रकार आहे.
पुढील स्लाइड्सवर वाचा, पत्रकार तरुणीसोबत घडलेली घटना...काय आहे तहर्रश... आणि तहर्रशबाबत काही महत्त्वाची माहिती..अखेरच्या स्लाइडवर पाहा VIDEO