आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ए‍का शीख व्यक्तीने कॅनडाला दिले होते आव्हान, लष्कर करावे लागले होते तैनात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जहाजमधील प्रवाशांसोबत उभे असलेले चळवळीचे आयोजक गुरदीत सिंह संधू (समोरुन डावीकडे) - Divya Marathi
जहाजमधील प्रवाशांसोबत उभे असलेले चळवळीचे आयोजक गुरदीत सिंह संधू (समोरुन डावीकडे)
इंटरनॅशनल डेस्क- 103 वर्षांपूर्वी कॅनडाने भारतीय प्रवाशी घेऊन जाणा-या कामागाटा मारु नावाच्या जहाजला व्हँक्योव्हर किनारपट्टीवर उतरवले होते. 1914 मध्‍ये एक भारतीय शीख उद्योगपती कॅनडात शिरण्‍यासाठी एक महिन्यापर्यंत सुमारे 370 हून अधिक लोकांना समुद्रात तळ ठोकून होता. मात्र, कॅनडाने हे होऊ दिले नाही. अखेर प्रवाशांचा संयमाचा बांध सुटला आणि त्यांनी आंदोलन सुरु केले. यात सुमारे 19 लोकांचा मृत्यू झाला होता. या घटनेबाबत गेल्या वर्षी म्हणजे तब्बल 102 वर्षांनी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी कामागाटा मारु घटनेसंदर्भात भारतीयांची माफी मागितली. ए‍का शीख व्यक्तीने कॅनडाला दिले आव्हान...
 
- 1908 मध्‍ये कॅनडा सरकारने स्थलांतरितांना रोखण्‍यासाठी कौन्सिलमध्‍ये एक ऑर्डर पारित केले होते. 
- या ऑर्डरनुसार फक्त असे लोक कॅनडात येऊ शकत होते ज्यांचा जन्म तेथेच झालेला असावा किंवा ते कॅनाडाचे नागरिक असावेत. 
- हा आदेश खास करुन भारतीयांना रोखण्‍यासाठी तत्कालीन कॅनडा सरकारने बनवला होता.  
- 1914 मध्‍ये सिंगापूरमध्‍ये राहणारा शीख उद्योगपती गुरदीत सिंह संधूने हे वैयक्तिक आव्हान म्हणून स्वीकारले.
 
कॅनडाने थांबवले अन्न आणि पाणीपुरवठा-
 
- संधू एक जपानी जहाज कामागाता मारुमध्‍ये 340 शीख, 24 मुस्लिम आणि 12 हिंदुंना घेऊन 23 मे 1914 रोजी कॅनडाच्या व्हॅक्युअरच्या बंदरावर पोहोचले. 
- डॉकवर जहाजला घेरण्‍यात आले. प्रवाशांना उतरण्‍याची परवानगी दिली गेली नाही. फक्त 20 कॅनेडियन नागरिकांना उतरवले गेले. 
- सरकारने जहाज परत जाण्‍यास सांगितले. सोबतच खाण्‍यापिण्‍याचा पुरवठा बंद केला. 
- तेव्हा कॅनडाने भारतीय स्थलांतरित आणि अमेरिकेने कॅनडाच्या कृतीवर विरोध दर्शवला होता. 
- त्यांनी पैसे जमा करुन अन्न आणि पाण्‍याचा पुन्हा पुरवठा केला.
 
न्यायालयाच्या निर्णयानंतर कॅनडाने तैनात केले सैन्य-
 
- स्थलांतरि‍तांचे प्रकरण न्यायालयात पोहोचले. परंतु निकाल कॅनडा सरकारच्या बाजूने लागला. 
- निकाल येताच सरकारने आर्मीचा एचएमसीएस रेनेबो शीप समुद्रात तैनात केले. 
- 23 जुलै 1914 रोजी दोन महिन्यांनंतर भारतीय असलेला जहाज भारतात परतले. 
- भारतात पोहोचताच ब्रिटिश सरकारने उद्योगपती संधू आणि त्यांच्या सहका-यांना अटक केली. 
- यामुळे प्रवाशी संतापले व हिंसक निदर्शन करुन लागले. यात 19 प्रवाशांचा मृत्यू झाला. 
- 2008 मध्‍ये ब्रिटिश कोलंबिया आणि कॅनडा सरकारने एका कार्यक्रमात सुमारे 100 वर्ष जुन्या घटनेवर माफी मागितली होती.
 
पुढील स्लाईड्सवर पाहा, PHOTOS....
बातम्या आणखी आहेत...