मर्लिन मनरोचा उडणाऱ्या स्कर्टचा फोटो पाहिला नसेल अशी व्यक्ती क्वचितच आपल्याला भेटेल. कारण गेल्या पाच ते सहा दशकांमध्ये अनेक पिढ्यांना तिच्या सौंदर्याने भुरळ घातली आहे. पिळदार सोनेरी केस आणि गालावरचा तो ब्युटीस्पॉट यामुळे तिच्या सौंदर्याच्या प्रेमात न पडणारा तरुण विरळाच. वयाच्या अवघ्या 36 व्या वर्षी जगाला भुरळ घालणाऱ्या या सौंदर्यवतीने जगाचा निरोप घेतला होता. तिच्या मृत्यूबाबतही अनेक प्रकारच्या चर्चा आहेत. 5 ऑगस्ट हा मर्लिनचा स्मृतीदिवस त्यानिमित्ताने तिच्या काही आठवणी खास तिच्या सर्व चाहत्यांसाठी आपण देणार आहोत.
एक जून 1926 ला जन्म झालेल्या मर्लिनने अत्यंत कमी कालावधीमध्ये एक प्रसिद्ध अभिनेत्री, मॉडेल आणि गायिका म्हणून नाव कमावले होते. जगभरातील हजारो चाहत्यांच्या हृदयावर ती अधिराज्य गाजवत होती. पण तिची खऱ्या अर्थाने जगभरात ओळख झाली ती तिच्या त्या फोटो ने. हवेमुळे उडणारा मर्लिनचा स्कर्ट आणि तो सावरण्यासाठी तिचे सुरू असलेले प्रयत्न अशा या फोटोने जगभरातील तिच्या चाहत्यांच्या पाकिटाबरोबरच हृदयातही स्थान मिळवले. पण जेवढा हा फोटो एवढा प्रसिद्ध असूनही तो कोणी काढला आणि त्यामागची कथा काय हे अनेकांना माहिती नाही, ती कथा आज सर्व चाहत्यांना सांगणार आहोत.
पुढील स्लाइड्सवर वाचा, या फोटोमागील संपूर्ण कथा...