आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

16 वर्षांपूर्वी हाेते ड्रग्जचे व्यसन, अाता शंभरावर काेटींच्या कंपनीचा मालक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाॅशिंग्टन- गरीब,अायुष्यात संघर्ष करणाऱ्या, ज्यांना इतर लाेक लायक समजत नाहीत अशा लाेकांना अमेरिकेच्या कंसास भागातील एलिट स्टाफ साेल्युशन ही कंपनी नाेकरी देत अाहे. ही कंपनी त्यांना दुसरी संधी देत अाहे. याचे कारण म्हणजे कंपनीचे संस्थापक क्रिस रिकरसन हेही अशाच परिस्थितीतून वर अालेले अाहेत. रस्त्यांवर भटकणारा, अाई स्वत:ला ड्रग्जच्या व्यसनातून बाहेर काढणारा क्रिस अाज शंभर काेटींच्या कंपनीचा मालक अाहे. या कंपनीने तीनच वर्षात २५४८% ग्रोथ मिळवली. क्रिसने तीन गरीब मुलांनाही दत्तक घेतले अाहे. त्याची अाई या मुलांची अाजी बनून पालनपाेषण करत अाहे. 

अाईला स्वत:ला व्यसनातून बाहेर काढले 
अायुष्याचा सुुरुवातीचाकाळ खूप दु:खद हाेता. मी १६ वर्षांचा असताना अाई अमली पदार्थांच्या अाहारी गेली हाेती. सर्वत्र ड्रग्ज पडलेले असायचे. घरावर अनेकदा छापेही पडले. मला शिक्षण साेडावे लागले. सरकारकडून गरिबांना मिळणारे ब्रेड खाऊन अाम्ही रस्त्यावर दिवस काढायचाे. याच दरम्यान अाई मलाही ड्रग्ज डीलरकडे घेऊन गेली. मला बळजबरीने ड्रग्ज विकण्यास भाग पाडले अाणि यातूनच मीही ड्रग्जच्या अाहारी गेलाे. मात्र त्याच वेळी ठरवले की मी अाईसारखा हाेणार नाही. या नशेतून मी स्वत:ला अाईलाही बाहेर काढेन, असा निर्धार केला. उपचार केंद्रांची मदत घेतली. हा काळ फार संघर्षात गेला. एक तर जेलमध्ये जाईन, अन्यथा असाच मरून जाईन, अशी परिस्थिती हाेती. मात्र ती बदलण्याचा मी निर्धार केला. ड्रग्जचे काम साेडून विटा वाहण्याचे काम केले, पेट्राेल पंपावरही नाेकरी केली. काही डाॅक्टरांनी मदत केली. त्यांनी रिकामी इमारत वापरण्यास दिली. ती किरायाणे देण्याचा पर्याय हाेता. यातून मिळणाऱ्या भाड्यातून ४० % रक्कम मला देण्यास ते तयार हाेते. मी या इमारतीतील हाॅल कार्यक्रमासाठी भाड्याने देणे सुरू केले. यातून चांगली कमाई हाेत हाेती. मी तेव्हा एका स्टाफिंग कंपनीतही काम करत हाेताे. मात्र तेथील अनुभव चांगला नव्हता. 

अनेक पात्र लाेकांना अपात्र समजून परत पाठवले जात हाेते. काही काळाने मी नाेकरी साेडून कंपनी सुरू करण्याचा निर्णय घेतला, मात्र ताे फार जुगार हाेता. सारी कमाई मी या कंपनीत गुंतवली. ज्यांनी अायुष्यभर संघर्ष केला त्यांना मी नाेकरी देत अाहे. कारण त्यांच्यात उद्याच्या अाशेचा किरण दिसताे. माझी अाईपण माझ्यासाेबतच राहते. ती खूपच शांत समजूतदार अाहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ती माझ्या मुलांची गेस्टेट अाजीही अाहे. 
बातम्या आणखी आहेत...