आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चारवर्षीय अलीचा फोन, दहशतवाद्यांनी अाजाेबांना मारून टाकले; तुम्ही गाडीतून येऊन मला वाचवा...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वडील सय्यद बशीर यांच्यासाेबत अली. - Divya Marathi
वडील सय्यद बशीर यांच्यासाेबत अली.
काबूल- मागील शुक्रवारी काबूलमधील एका मशिदीत झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २० नागरिक मारले गेेले हाेते. यादरम्यान सुरक्षा दलांनी एका चारवर्षीय मुलाला मशिदीच्या व्हरांड्यातून सहीसलामत वाचवले हाेते. मुलाचे हेच छायाचित्र या दहशतवादी हल्ल्याचे प्रतीक बनले. हे छायाचित्र फाेटाे जर्नालिस्ट उमर शाेबानी यांनी काढले हाेते. जाणून घ्या काय झाले हाेते त्या दिवशी, मुलाचे वडील सय्यद बशीर यांच्या शब्दांत...

मी माझे वडील व मुलगा अलीसाेबत शुक्रवारी नमाजपठणासाठी गेलाे हाेताे. मात्र, काही कारणासाठी मला मशिदीबाहेर जावे लागले. काही वेळेनंतर मशिदीतून माेठ्या स्फाेटासारखा अावाज अाला. तसेच गाेळीबार व किंकाळ्या अादीचा अावाजदेखील एेकू येत हाेता. त्यामुळे घाबरून मी वडिलांना फाेन लावला. मात्र, फाेनची रिंगटाेन बराच वेळ वाजत राहिली. अखेर ताे फाेन माझा चारवर्षीय मुलगा अलीने उचलला. ताे म्हणाला, ‘त्यांनी अाजाेबांना मारून टाकले. मला खूप भीती वाटतेय. त्यामुळे तुम्ही लवकर गाडी घेऊन या व मला वाचवा.’ त्यानुसार मी तत्काळ तेथे गेलाे; परंतु पाेलिसांनी मशिदीत जाऊ देण्यास नकार दिला. मी पुन्हा फाेन लावला व अलीशी बाेललाे. ताे घाबरला हाेता. मात्र, बाेलणे पूर्ण हाेऊ शकले नाही. त्याच वेळी दुसरा स्फाेट झाल्याने अाशा मावळली. फाेन स्विचअाॅफ झाला हाेता. मात्र, काही वेळेनंतर पाेलिसांसह अली मशिदीबाहेर येताना दिसला. मी पळत जाऊन त्याला कडेवर घेतले. परंतु या घटनेचा अलीच्या काेवळ्या मनावर खूप माेठा परिणाम झाला अाहे. 
बातम्या आणखी आहेत...