आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Story Of Innocent People Who Killed In Paris Attacks

..तू आयुष्यभर सोबत राहशील, पॅरिस हल्ल्यातील मृतास प्रेयसीची श्रद्धांजली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पॅरिसवरील दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण जगाला हादरवून सोडले आहे. या हल्ल्यामध्ये जवळपास 129 निष्पाप नागरिकांना प्राण गमवावे लागले आहेत. या 129 जणांपैकी 103 जणांची ओळख पटली आहे. या मृतांच्या नातेवाईक, मित्रांकडून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली जात आहे.

हल्ल्यातील मृतांची ओळख पटल्यानंतर जुन्या आठवणींनी त्यांच्या आप्तेष्ठांच्या बेचैन करून सोडले आहे. अनेकजण सोशल मिडियाच्या माध्यमांमधून त्यांचे फोटो आणि आठवणी शेअर करत आहेत. हे फोटो पाहिल्यानंतर आणि त्यांच्या बावना जाणून घेतल्यानंतर या निरागस लोकांची काय चूक होती, असा प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो आणि आपल्याला स्तब्ध करून सोडतो.

निक अलेक्झांडर (36 वर्षे)
लंडनचे राहणारे अलेक्झांडर एका कंपनीमध्ये मर्कंडाईज मॅनेजर होते. त्याच्या कुटुंबीयांनी आणि मित्रांनी तो अत्यंत आनंदी आणि मजेशीर व्यक्ती असल्याचे सांगितले आहे. त्याच्या कुटुंबीयांनी त्याच्याबाबत सांगितले की, निक त्याला आवडणारे काम करताना मृत्यू पावला. जगभरातील त्याच्या मित्रांसाठी तो किती महत्त्वाचा होता, हे जाणून घेऊनच आमचे सांत्वन झाले आहे. त्याच्या मैत्रिणीने त्याच्या मृत्यूबाबत माहिती मिळाल्यानंतर हा फोटो ट्विटरवर शेअर केला होता. तू आयुष्यभर माझ्यासोबत राहशील, अशा भावना त्यात व्यक्त करण्यात आल्या होत्या.
पुढील स्लाइड्सवर वाचा, या हल्यातील इतर मृतांबाबत त्यांच्या नातेवाईकांनी व्यक्त केलेल्या भावना...