आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऐतिहासिक क्षण: मदर आता संत तेरेसा; पोप फ्रान्सिस यांनी बहाल केले संतपद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वेटिकन सिटीमध्‍ये मदर तेरिसांचा संतपद देण्‍यात आले. - Divya Marathi
वेटिकन सिटीमध्‍ये मदर तेरिसांचा संतपद देण्‍यात आले.
व्हॅटिकन/कोलकाता- गरीब,निराधारांसाठी आपले अवघे जीवन समर्पित करणाऱ्या मदर तेरेसा आता संत तेरेसा म्हणून ओळखल्या जातील. लाखापेक्षा जास्त लोकांच्या उपस्थितीत पोप फ्रान्सिस यांनी त्यांना संत ही उपाधी बहाल केली.

विसाव्या पुण्यतिथीनिमित्त सोमवारी संत तेरेसा यांचे पहिले पर्व साजरे केले जाईल. व्हॅटिकनमध्ये एका भव्य सोहळ्यात पोप फ्रान्सिस यांनी मदर तेरेसा यांच्या जीवनातील अनेक आठवणी सांगितल्या. ते म्हणाले, ‘मदर तेरेसा यांना संत म्हणताना आपल्याला कदाचित थोडे अवघडल्यासारखे वाटू शकते. परंतु ही पवित्र मूर्ती कायम आपल्या मनात आहे. त्यांनी जगाला इतके प्रेम दिले की त्या माता म्हणूनच प्रत्येकाच्या मनात राहिल्या.’

व्हॅटिकनच्या सेंट पीटर्स स्क्वेअरवर पोप फ्रान्सिस म्हणाले, ‘मदर तेरेसा यांनी आपल्या कार्याच्या माध्यमातून जगासमोर असा आदर्श घालून दिला की गरिबीला जन्माला घालणाऱ्यांच्या मनात अपराधाची भावना निर्माण व्हावी.’ गरिबांतील गरीब उपेक्षितांसाठी त्यांनी केलेली सेवा हीच त्यांना ईश्वराच्या जवळ नेणारी साक्ष ठरते. त्यांचे कार्य मी आता तुम्हाला सोपवत आहे. तुम्हीच ते पुढे न्यावे, असेही पोप म्हणाले.

सोहळ्यास सुषमा स्वराज, ममता बॅनर्जींची उपस्थिती
भारताच्या प्रतिनिधी म्हणून या सोहळ्याला परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालही एका पथकासह उपस्थित होते. मुंबईत तेरेसांच्या स्मरणार्थ भारतीय टपाल खात्याने काढलेल्या विशेष तिकिटाचे अनावरण दूरसंचार राज्यमंत्री मनोज सिन्हा यांच्या हस्ते करण्यात आले.

पोप म्हणाले... मदरतेरेसा दयाळू संत होत्या. उपेक्षित व्याधीग्रस्तांसाठी त्या जणू जीवनरक्षक होत्या. त्यांची दयाळू वृत्ती म्हणजे गरिबी वेदनेने पिडलेल्या लोकांसाठी आशेचा किरण होता.

आज तेरेसा यांचे पहिले पर्व
मदर तेरेसा यांच्या विसाव्या पुण्यतिथीनिमित्त कोलकात्यात सोमवारी पहिले पर्व साजरे केले जाईल. १९९७ मध्ये याच दिवशी त्यांनी देहत्याग केला होता. कोलकात्यातील मिशनरीज ऑफ चॅरिटीच्या मुख्यालयात मुख्य समारंभ होईल. रविवारी हे मुख्यालय सजवण्यात आले होते. समोर मोठ्या अक्षरांतील ओळ लक्ष वेधून घेत होती... “सेंट तेरेसा ऑफ कलकत्ता, प्रे फॉर अस.’

१५०० गरिबांचा सन्मान
एक लाख लोक, १३ देशांचे प्रमुख स्पेनच्या महाराणी सोफिया यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या सोहळ्यात १५०० गरीब लेाकांचा विशेष सत्कार करण्यात आला. इटलीमध्ये विविध केंद्रांवरून त्यांना या ठिकाणी आणण्यात आले होते. या सर्वांना सर्वांत समोर बसवण्यात आले होते. पोप फ्रान्सिस यांनी त्यांना पिझ्झा लंच दिला. नन आणि पाद्रींनी त्यांना पिझ्झा वाढला.

पुढील स्लाइडमध्ये इन्फोग्राफिक्समधून समजून घ्या मदर तेरेसांचा संतपदाचा प्रवास....
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...